भागलपूर: हॅलो… तुझे नाव काय आहे? तुझं लग्न झाले आहे का? अविवाहित आहेस का? मी व्हिडिओ कॉल करत आहे. तो उचल आणि माझ्याशी बोल. तू कोणत्या पोलीस ठाण्यात तैनात आहेस? तू कॉल कट केलास तर ते तुला अशा ठिकाणी ड्युटीवर लावतील की तेथे तू वैतागून जाशील. होय, भागलपूरच्या डझनभर महिला पोलीस अशाच काही कॉल्समुळे हैराण झाल्या आहेत. रात्री उशिरा हा फोन येतो. हा व्हिडिओ कॉल कट केला तर तो समोरून धमकी देतो. कॉलवर अश्लील हावभाव करतो. या सेक्स मॅनियॉकची कहाणी संपूर्ण परिसरात प्रसिद्ध झाली आहे. तो महिला पोलिसांच्या शरीरासंदर्भात अश्लील हावभाव करतो. महिला नाराज होतात आणि कॉल डिस्कनेक्ट करतात. नंतर तो धमकी देतो. हे करणारी व्यक्ती आपण सार्जंट मेजर असल्याचे सांगतो.

महिला पोलीस कर्मचारी त्रस्त

महिला पोलीस या व्यक्तीमुळे अतिशय चिंतेत आहेत. तू आता कुठे आहेस, असे तो कॉल करून विचारतो. त्यानंतर तो व्हिडीओ कॉल करणार आहे असे सांगतो आणि जर तो व्हिडिओ कॉल उचलला नाहीस तर तुझी अत्यंत धोकादायक ठिकाणी ड्युटी लावली जाईल, अशी धमकीही देतो. कॉलमध्ये आरोपी महिला पोलिसांना त्यांचे चेहरे दाखवण्यास सांगतो. त्यानंतर अश्लील संभाषण सुरू करतो. महिलांच्या अंगांबद्दल तो टिप्पण्या करतो. व्हिडिओ कॉल डिस्कनेक्ट केल्यानंतर, तो पुन्हा पुन्हा कॉल करतच राहतो.

Ruturaj Gaikwad Wedding: क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाडने बांधली लगीनगाठ, शेअर केले उत्कर्षासोबतचे सुंदर फोटो
भागलपूरमध्ये खळबळ

हे संपूर्ण प्रकरण भागलपूरच्या इशकचक पोलिस ठाण्याच्या महिला पोलिसांशी संबंधित आहे. त्यानुसार महिला पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कोतवाली पोलीस ठाण्यातील महिलाही अशा कॉल्समुळे हैराण झाल्या आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याची चौकशीही सुरू झाली आहे. ऑडिओ कॉल आधी येतो, असे महिला पोलिसांनी तक्रारीत म्हटले आहे. कॉल उचलल्यानंतर ती व्यक्ती तुझी ड्युटी कुठे आहे, असे विचारते. आता कुठे आणि कोणत्या अवस्थेत आहेस? तू कोणत्या पोलीस ठाण्यात आहेस? त्यानंतर तो व्हिडिओ कॉल करण्याविषयी सांगतो. जेव्हा महिला कॉन्स्टेबल त्यांला सांगतात की, त्यांचे लग्न झाले आहे. त्यानंतर तो शिवीगाळ करू लागतो. अश्लील हावभाव करतो आणि दुसऱ्या ठिकाणी भेटण्यासाठी बोलावतो.

इंग्लंडमधील विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथच्या रेकॉर्डमध्ये जमीन-अस्मानाचा फरक, WTC फायनलमध्ये कोणाचे पारडे जड?
सेक्स मॅनिऑक आहे आरोपी

असा फोन एका महिला कॉन्स्टेबलला आल्याने ही बाब उघडकीस आली. त्याने स्वत:ची ओळख पोलीस ठाण्यातील सार्जंट मेजर अशी करून दिली. त्यानंतर महिलेने लगेचच आपण दोन मुलांची आई असल्याचे सांगितले. शिवीगाळ केल्यानंतर फोन कट केला. यानंतर महिला कॉन्स्टेबलने ही घटना आपल्या सहकाऱ्यांना सांगितली. हळूहळू सर्व महिला हवालदारांनी सांगितले की, त्यांनाही असे फोन येतात. हे प्रकरण वरिष्ठांपर्यंत पोहोचल्यानंतर याप्रकरणी कारवाई सुरू झाली आहे.

भरधाव जीपची टक्कर चुकवण्यासाठी वळवताना एसटी बस उलटली, ७ गंभीर जखमी, तर २३ प्रवाशांना लागला किरकोळ मार
पोलिसांनी तपास सुरू केला

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर दोन पोलीस ठाण्याचे पोलीस तपासात गुंतले आहेत. तज्ज्ञ अशा लोकांना सेक्स मॅनिऑक म्हणतात. असे लोक केवळ अश्लील बोलून आपली मानसिक विकृती शांत करतात. त्यांना हा एक प्रकारचा आजार आहे. या आजारात त्यांना सतत कोणाचा तरी छळ करण्यात मजा येते. महिलांचा मोबाईल क्रमांक आरोपींपर्यंत कसा पोहोचला याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. याबाबत महिलांकडेही चौकशी सुरू आहे. त्यानंतर इतर जिल्ह्यातही अशा घटना घडल्याचे समोर आले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here