नवी दिल्ली: अब्जाधीश उद्योगपती, ट्विटर आणि स्पेस-एक्सचे मालक एलन मस्क त्यांच्या मजेदार ट्विटसाठी प्रसिद्ध आहेत. आपल्या ट्विटद्वारे ते नेहमी चर्चेत असतात. यावेळी एक मजेदार किस्सा घडला आहे. मस्क यांच्या एका ट्विटवर दिल्ली पोलिसांनी मजेशीर उत्तर दिले आहे. मस्कने त्यांचा मुलगा लिल एक्सकडून ट्विटरवर एक प्रश्न शेअर केला. त्यात त्यांनी विचारले की, पोलिसांकडे स्निफर कुत्रे आहेत, पण मांजरी का नाहीत? मस्कच्या या ट्विटला दिल्ली पोलिसांनी अतिशय मजेशीर उत्तर दिले आहे.

पोलिसांकडे स्निफर मांजर का नाही?

एलन मस्क यांनी गुरुवारी ट्विट केले. ते लिहितात ‘लिल एक्सने विचारले की पोलिसांकडे मांजरी आहेत का?, कारण पोलिसांकडे स्निफर कुत्रे असतात.” यानंतर ट्विटरवर अनेकांनी मस्कच्या या प्रश्नाला आपापल्या पद्धतीने उत्तर दिले आहे. तर दिल्ली पोलिसांनी दिलेल्या मजेशीर उत्तराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

हॅलो… तू अविवाहित आहेस का?, महिला पोलिसांना तो करतो अश्लील व्हिडिओ कॉल, पोलीस दलात खळबळ

दिल्ली पोलिसांनी दिले मजेशीर उत्तर

दिल्ली पोलिसांनी ट्विट केले की, ‘एलन मस्क, कृपया लिल एक्सला सांगा की मांजरींना पोलीसदलात ठेवले जात नाही कारण त्यांच्यावर feline-y आणि ‘purr’ petration चा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. इथे दिल्ली पोलिसांनी या दोन शब्दांसह शब्दांचा खेळ खेळला आहे. या शब्दाचा अर्थ गुन्हा आहे. हिंदीत Felony आणि perpetration या शब्दांचा अर्थ गुन्हा असा होतो.

Ruturaj Gaikwad Wedding: क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाडने बांधली लगीनगाठ, शेअर केले उत्कर्षासोबतचे सुंदर फोटो
ट्विटरवर लोक या शब्दांचा केलेला वापर आणि मनोरंजक उत्तरासाठी दिल्ली पोलिसांचे कौतुक करत आहेत. दिल्ली पोलिसांनी ‘फेलनी (गुन्हा)’ आणि ‘परपीट्रेशन (गुन्हा)’ मधील शब्दांची चमत्कृती करून दाखवत उत्तर दिले आहे.

इंग्लंडमधील विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथच्या रेकॉर्डमध्ये जमीन-अस्मानाचा फरक, WTC फायनलमध्ये कोणाचे पारडे जड?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here