मुंबई: शिवसेना नेते यांना डॉक्टरांविरोधातील वक्तव्य भोवण्याची शक्यता अधिकच बळावली आहे. मार्डने राऊत यांच्याविरोधात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केलेली असतानाच इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) राऊतांविरोधात थेट राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती यांच्याकडे तक्रार केली आहे. राऊतांना डॉक्टरांचा अवमान करणारी विधानं करण्यापासून रोखा, अशी विनंती आयएमएने व्यंकय्या नायडू यांना केली आहे.

आयएमएने थेट राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून संजय राऊत यांची तक्रार केली आहे. संजय राऊत हे महाराष्ट्रातील राज्यसभेचे सदस्य आहे. त्यांनी एक मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना डॉक्टरांचा अवमान करणारं विधान केलं आहे. डॉक्टरांपेक्षा कंपाऊंडरला अधिक कळतं. मी नेहमीच कंपाऊंडरकडून औषधे घेतो, डॉक्टरांकडून नाही, असं ते या मुलाखतीत म्हणाले होते. तसेच जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) ही निरुपयोगी संस्था आहे. डब्ल्यूएचओच्या निष्काळजीपणामुळेच करोनाचा प्रादुर्भाव झाला आहे, असंही राऊत यांनी म्हटल्याचं आयएमआयने तक्रारीत म्हटलं आहे.

१६ ऑगस्ट रोजी आमच्या राज्य कार्यकारिणीची बैठक झाली. त्यात राऊत यांच्या वक्यव्याच्या निषेधाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. तसेच राऊत यांनी त्यांचे शब्द मागे घ्यावेत आणि डॉक्टरांची माफी मागावी असा ठरावही करण्यात आल्याचं आयएमएने म्हटलं आहे. राऊत यांचं हे विधान डॉक्टरांचा अवमान करणारं तर आहेच पण डॉक्टरांचा अनादर करणारंही आहे. त्यामुळे राज्यातील डॉक्टरांच्या भावना दुखावल्या आहेत. गेल्या साडेचार महिन्यापासून करोनाच्या संकटातही धैर्याने काम करणाऱ्या डॉक्टरांचं मनोबल खच्चीकरण करणारं राऊत यांचं वक्तव्य आहे. त्यामुळे राऊत यांना अशा प्रकारची विधानं न करण्याची समज द्यावी, अशी मागणीही आयएमएने नायडू यांच्याकडे केली आहे. आयएमएच्या ठाणे शाखेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून राऊत यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, डॉक्टरांवर जेव्हा जेव्हा संकट आले तेव्हा शिवसेनाच धावून आली. मी स्वत: अनेक प्रकरणात डॉक्टरांची बाजू घेऊन त्यांच्या मागण्या मार्गी लावल्या आहेत. डॉक्टरांना मारहाण झाली तव्हा तोडफोड करणाऱ्यांना आम्हीच समजावून समेट घडवून आणला आहे. मात्र, सध्या विशिष्ट विचारसरणीचे लोक माझ्या विरोधात मोहीम चालवत आहेत, असं सांगतानाच डॉक्टरांचा मी अपमान केलेला नाही. डॉक्टरांबाबत मी कोणतंही चुकीच विधान केलेलं नाही. कशासाठी डॉक्टराचां अपमान करावा. माझ्या बोलण्याच्या ओघात एक शब्द तुटकपणे येतो आणि त्यावर राजकारण केलं जातं हे चुकीचं आहे, असं सांगतानाच अपमान आणि कोटी यातील फरक समजून घ्या, माझ्या बोलण्यामागची भावना समजून घ्या, असं आवाहन राऊत यांनी केलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

7 COMMENTS

  1. I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here