अकोला : यवतमाळ आणि अकोला पोलिसांनी बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात खुलेआम चालणाऱ्या एका जुगराच्या क्लबवर छापा टाकला. पोलिसांनी या ठिकाणाहुन ८० पेक्षा अधिक लोक ताब्यात घेतले आहेत. तसेच १ कोटी ८ लाख १९ हजारांवर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अमरावती परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक यांनी यवतमाळ आणि अकोला पोलिसांचे पथक तयार करून ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, एखाद्या चित्रपटात दाखवल्याप्रमाणेच हा भला मोठा जुगार क्लब शेगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीतील गौरव बार अँड रेस्टॉरंटमध्ये सुरू होता. दरम्यान, स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली असल्याचे समजते. या कारवाईनंतर आता नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी म्हणून ओळख असलेल्या शेगावमध्ये गौरव बार अँड रेस्टॉरंटमध्ये खुलेआम जुगार क्लब सुरू असल्याची माहिती अमरावती परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक यांना मिळाली. त्यानुसार आयजींनी पोलिसांचं एक पथक तयार केलं. काल रात्री या पथकाला शेगावमधील गौरव बार अँड रेस्टॉरंटमध्ये सुरू असलेल्या जुगार क्लबवर भेट दिली. यादरम्यान इथे मोठ्या प्रमाणात जुगार खेळत असल्याचे दिसून आले. आयजींच्या पथकाने लागलीच या सर्वांना ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये ८१ लोकांचा सहभाग असल्याचे समजते आहे. यामध्ये अनेक लोक सरकारी नोकरदार तसेच सुशिक्षित असल्याचे दिसून आले.

Shocking News: लग्न ठरलं पण वजन ९५ किलो होतं, वेट लॉस सर्जरीसाठी गेली अन् तासाभरात मृत्यू
अकोला आणि यवतमाळ पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर आता शेगाव पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण होतो आहे. दरम्यान, जर शेगाव शहरात आयजींना कारवाई करावी लागत असेल तर स्थानिक पोलीस करतात तरी काय? असा प्रश्न देखील यादरम्यान उपस्थित केला जात आहे.

या क्लबवरुन रोख रक्कम ७ लाख १ हणार २०० रूपये, वेगवेगळया किंमतीचे वेगवेगळया कंपणीचे ११९ मोबाईल ज्यांची एकत्रित किंमत १३ लाख ७२ हजार ८०० रूपये. जुगार, ताश पत्ते १९ बॉक्स प्रत्येकी किंमत ७ हजार ५०० रूपये, लाकडी टेबल, प्लास्टीकच्या ९६ खुर्च्या, लोखंडी खुर्ची, दोन व्हील चेअर, ३८ मोटर सायकली ज्यांची प्रत्येकी सरासरी अंदाजे किंमत १९ लाख रूपये, चारचाकी वाहने, जुगार खेळण्यास वापरणारे वेगवेगळे किंमत दर्शविणारे ३९३ प्लास्टीक क्वॉईन या मुद्देमाल ऐकून किंमत १ कोटी ८ लाख १९ हजार ८०० रूपये अशी आहे. हा जुगार अड्डा प्रमोद धर्मराज सुळ (वय ५४ वर्षे रा. शेगाव जि. बुलढाणा.) चालवत होता. जुगार खेळ खेळणारे ८० लोक ताब्यात असून अन्य लोक पसार झाले आहे. यांच्याविरुद्ध कलम ४, ५ महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम प्रमाणे पोलीस स्टेशन शेगाव इथं गुन्हा दाखल करण्यात आला.

Crime News: पोटच्या लेकीवर २५ वेळा चाकूने वार, पत्नी दिसताच बोटं कापली; बापाचा संताप ठरलं झोपेचं ठिकाण…
शेगाव शहरात सुरू असणाऱ्या या जुगार क्लबला राजकीय तसेच स्थानिक पोलिसांचे पाठबळ होतं का? असा प्रश्नही या कारवाईनंतर उपस्थित केला जात आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हे सुट्टीवर असल्यामुळे ठाण्याची जबाबदारी एका एपीआय अधिकाऱ्याकडे देण्यात आली होती. आता पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकाच्या कारवाईनंतर स्थानिक जिल्हा पोलीस अधीक्षक संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यावर काय कारवाई करतात हे पाहणे गरजेचे असणार आहे.

Crime Diary: प्रेयसीचा पती गावी येणार तोच प्रियकराचं प्लॅनिंग, युपीहून मुंबईत आला अन्…; कांदिवली व्यापाऱ्याच्या हत्येचं भयानक सत्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here