नांदेड : मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका ६२ वर्षीय व्यक्तीचा कारच्या धडकेत मृत्यू झाला होता. हदगाव तालुक्यातील मनाठा येथे शुक्रवारी ही घटना घडली होती. आता या प्रकरणाला वेगळं वळणं आलं आहे आणि धक्कादायक बाब समोर आली आहे.अपघात नव्हे तर घातपात

जुन्या वादातून लहान भावानेच आपल्या मुलांच्या मदतीने मोठ्या अपघात घडवून आणला आहे. या प्रकरणी मनाठा पोलिसांनी मृताचा भाऊ आणि तीन पुतण्यासह सात जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

मृत उत्तम शिंदे आणि त्यांचा सख्खा लहान भाऊ मारोती शिंदे यांच्यात गेल्या काही वर्षांपासून शेती आणि संस्थेचा वाद सुरू होता. यामुळे अनेकवेळा त्यांच्यात नेहमी वाद व्हायचे. दरम्यान, २ जूनला उत्तम शिंदे हे आपल्या मित्रासोबत मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. मनाठा येथील रमेश बोईनवाड यांच्या आखाड्याजवळ येताच त्यांना कारने धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने उत्तम शिंदे यांचा मृत्यू झाला होता.

वरातीत नाचण्यावरून दोन गटात वाद, दलित तरुणाची हत्या, ॲट्रॉसिटीचा दणका, ७ जण जेलमध्ये
जुना वाद मनात ठेवून आणि कट कारस्थान रचून आरोपींनी हा अपघात घडवून आणला आणि उत्तम शिंदे यांचा खून केला, असा आरोप मृताच्या मुलाने केला होता. आरोपी विरोधात जोपर्यंत खुनाचा गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत अंत्यविधी करणार नाही, असा पावित्रा नातेवाईकांनी घेतला होता.

लोक चिडवायचे म्हणून क्लास नाही लावला, तृतीयपंथी शेजलचं परिस्थितीवर मात करत बारावीत यश

अखेर विशाल शिंदे यांच्या तक्रारीवरून मनाठा पोलिसांनी मृताचा भाऊ मारोतराव शिंदे, पुतण्या सुहास शिंदे, अमोल शिंदे, संदीप शिंदे यांच्यासह शेजारी असलेले संजय नारायण बल्लाळ, शुभम बल्लाळ, सौरभ बल्लाळ यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुल्लक कारणातून सख्ख्या भावानेच भावाचा काटा काढल्याने मनाठा गावात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक संतोषी शेकडे हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here