बुलढाणा : जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर रात्री तीन वेगवेगळ्या ठिकाणी तीन अपघात झालेत. या तीन अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील मेहकरजवळ मुंबई कॉरिडॉरवरील चेनेज क्रमांक २८३ जवळ वाशिमहून बीडकडे जाणाऱ्या कारमधील काही प्रवासी लघुशंकेसाठी थांबले होते. अज्ञात वाहनाने त्यातील विजय मंटे (रा. दिग्रस) हा जागीच ठार झाला. तर त्याचे दोन मित्र जखमी झाले आहेत.

दुसरा अपघात धुळ्याहून नागपूरकडे जाणाऱ्या अर्टिगा कारचा झाला. कारवरील नियंत्रण सुटल्याने कार उलटली. या अपघातात कारमधील तिघांपैकी एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दोन जण जखमी आहेत. त्यांच्यावर मेहकर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं, नवसासाठी जाणाऱ्या गाडीचा भीषण अपघात; २० भाविक गंभीर जखमी
तर नागपूर कॉरिडॉरवर मेहकरजवळ चेनेज २८० वर एक ट्रक चालकाला डुलकी लागली. यामुळे ट्रकवरील नियंत्रण सुटून क्रॅश बेरिअर तोडून ट्रक महामार्गाच्या खाली उतरला. या अपघातात चालक दिनेशकुमार तिवारी (रा. आझमगड) हा जागीच ठार झाला.

समृद्धी मार्गावर अपघाताची मालिका

समृद्धी मार्गावरील अपघात अनेक उपाययोजना केल्यानंतरही थांबत नाही. आता वैयक्तिक प्रवास करताना वाहन चालकांना आपल्यावर आणि आपल्या वेगावर नियंत्रण आणणं गरजेचं आहे. कारण की मुख्यतः समृद्धी मार्गावर वाहतूक करणाऱ्या प्रवाशांपैकी कौटुंबीक सदस्यांच्या अपघाताचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे एका क्षणाचा सुसाट वेग कायमस्वरूपी तुमचा शेवट करू शकतो, हे भान सर्वांनी राखले पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here