नवी दिल्ली : देशातल्या काही राज्यांमध्ये तीव्र उन्हाळा आहे तर काही राज्यांमध्ये तुफान पाऊस सुरू आहे. अशात हवामान खात्याकडून (IMD) मान्सून २०२३ संबंधी मोठी माहिती समोर आली आहे. मान्सूनच्या पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. नैऋत्य मान्सून (Southwest Monsoon) लवकरच देशात दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने यासंदर्भात माहिती दिली आहे.

मान्सूनने धरला वेग

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, केरळच्या किनारपट्टीपासून मान्सून अवघ्या ४०० किलोमीटर अंतरावर आहे. मान्सूनसंबंधी भारताच्या हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, तो सध्या दक्षिण अरबी समुद्र, मालदीव आणि कौमोरिन परिसरात दाखल झाला आहे. तर दुसरीकडे, दक्षिण बंगालचा उपसागर आणि पूर्व मध्य बंगालच्या उपसागरातही मान्सून वेगाने पुढे सरकताना दिसत आहे. त्यामुळे लवकरच मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.

Monsoon Alert 2023: अरबी समुद्रातून धडकणार २ तीव्र चक्रीवादळे, या तारखेपर्यंत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट
खरंतर, केरळमध्ये ४ जून रोजी नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन होईल अशी शक्यता IMD ने आधीच वर्तवली होती. साधारणपणे १ जून रोजी केरळमध्ये मान्सून दाखल होतो. पण यंदाच्या हवामान बदलामुळे मान्सूनला येण्यास विलंब झाला आहे. दरम्यान, पुढच्या ४८ तासांत नैऋत्य मान्सून दक्षिण अरबी समुद्र, मालदीव, कौमोरिन, दक्षिण बंगालचा उपसागर, पूर्व मध्य बंगालचा उपसागर आणि ईशान्य बंगालच्या उपसागराच्या काही भागात पुढे सरकण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात मान्सून कधी येणार

दरम्यान, मान्सून आज केरळात दाखल झाला तर कर्नाटक आणि गोव्याच्या किनारपट्टीवर जोरदार मान्सून पूर्व पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रात वरुणराजाचे १० जूनला आगमन होणार असल्याची, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

Monsoon Update: यंदा मान्सूनची जोरदार बॅटिंग, धो-धो बरसणार, पण जूनमध्ये…; IMD चा हवामान अंदाज
खाजगी हवामान संस्था स्कायमेटने दिलेल्या माहितीनुसाार, पुढच्या २४ तासांत अंदमान आणि निकोबार बेटे, केरळ आणि लक्षद्वीपमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पाऊस पडू शकतो. तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर आणि ईशान्य राजस्थानमध्येही धुळीच्या वादळासह हलका ते मध्यम पाऊस पडेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

वादळाचं भयानक रुप; बागेतल्या वस्तू कागदाप्रमाणे उडाल्या

स्कायमेटने दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडू, ईशान्य भारत आणि सिक्कीमच्या अंतर्गत भागात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. तर दुसरीकडे, पश्चिम हिमालय, गंगेच्या पश्चिम बंगाल, किनारी ओडिशा, किनारी कर्नाटक, दक्षिण अंतर्गत कर्नाटक आणि महाराष्ट्रात १ किंवा २ ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Monsoon Updates: IMD ने मान्सूनबाबत दिली गुड न्यूज, एल निनोचा धोका असतानाही असा बरसणार पाऊस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here