परभणी : परभणी जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून तापमान ४० अंश पार झालेले आहे. अशातच बहिणीला भेटण्यासाठी शनिवारी भर दुपारी पायी निघालेल्या भावाला उन्हामध्ये चक्कर आल्याने रस्त्यावर पडून उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील सिरसम या गावामध्ये घडली आहे. माणिक हरिभाऊ कोकरे असे उष्माघाताने मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे कोकरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

यावबाबत मिळालेली माहिती अशी की, परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील सिरसम येथील रहिवासी माणिक हरिभाऊ कोकरे हे आपल्या बहिणीला भेटण्यासाठी उंडेगाव येथे पायी दुपारी भर उन्हामध्ये निघाले होते. मात्र, परभणीत मागील काही दिवसांपासून उन्हाचा पारा चाळीस अंशाच्या वर जात असल्यामुळे त्यांना दुपारच्या वेळी उन्हात पायी चालत असताना चक्कर आल्याने रस्त्यावर कोसळले. दुपारची वेळ असल्यामुळे रस्त्यावर वर्दळ कमी होती त्यामुळे कोकरे उन्हामध्येच पडून राहिले. कोकरे हे रस्त्यावर पडले असल्याची माहिती नातेवाईकांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनीस्थळी धाव घेत त्यांना उपचारासाठी गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलं.

समृद्धी महामार्गावर लघुशंकेसाठी थांबणे जीवावर बेतले, तीन मित्रांपैकी एक ठार, अज्ञात वाहनाची धडक
मात्र, या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी करून त्यांना मृत घोषित केले तसेच त्यांचा मृत्यू उष्माघाताने झाला असल्याची शक्यता वर्तवली. त्यानंतर माणिक कोकरे यांचे शवविच्छादन करून मृतदेह रात्री उशिरा नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या घटनेमुळे कोकरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.
Pune News: रिक्षाचालक कानाला कडकडून चावला, चव्हाणांच्या कानाचा लचकाच लुटला, पुण्यातील भयंकर घटना
दरम्यान, परभणी जिल्ह्यामध्ये तापमान चांगलेच वाढले असल्याने नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी दुपारच्या वेळी घराबाहेर पडू नये असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी गंगाखेड तालुक्यातील उंडेगाव येथील एका व्यक्तीचा उष्माघातामुळे मृत्यू झाला होता त्यामुळे परभणी जिल्ह्यामध्ये हा उष्माघाताचा दुसरा बळी ठरला आहे.

Odisha Train A​ccident Reason : ओडिशा रेल्वे दुर्घटनेचं खरं कारण कळलं, रेल्वे मंत्र्यांची मोठी माहिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here