“एलसीए (लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट) तेजसला भारतीय हवाई दलाने पाकिस्तान सीमेजवळील पश्चिम आघाडीवर तैनात केले आहे. शत्रूच्या कोणत्याही कारवाईला प्रत्युत्तर देण्यासाठी या विमानांचा उपयोग केला जाणार आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी एएनआयला दिलीय.
फ्लाइंग ड्रॅगन म्हणून तेजस लढाऊ विमानाचे पहिले स्क्वॉड्रन ओळखले जाते. हवाई दलाचे ४५ वे स्क्वॉड्रन दक्षिण कमांड अंतर्गत सुलूर येथे आहे. या ठिकाणी ही विमानं तैनात आहेत. शत्रूच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी तेजस विमानं तिथे तैनात केली गेली आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून स्वदेशी तेजस विमानाचे कौतुक केले आहे. एलसीए मार्क -1 ए आवृत्ती खरेदी करण्याचा सौदा लवकरच पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, असं पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात म्हणाले होते.
एकीकडे तेजस सैनिकांचे पहिले स्क्वाड्रॉन प्रारंभिक ऑपरेशनल क्लीयरन्स व्हर्जनचे आहे. तर दुस ऱ्या बाजूला दुसरा स्क्वाड्रन (18 स्क्वॉड्रन) ‘फ्लाइंग बुलेट्स’ अंतिम फायनल ऑपरेशनल क्लीयरन्स व्हर्जनचे आहे. हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल आरकेएस भदोरिया यांनी २७ मे रोजी सुलूर हवाई तळावर या स्क्वॉड्रनच्या ऑपरेशनला सुरवात केली होती.
हवाई दल आणि संरक्षण मंत्रालय या वर्षाच्या अखेरीस ८३ मार्क -1 ए विमानाच्या सौद्यावर शिक्कामोर्तब करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय. सीमेवर चीनची आक्रमक भूमिका पाहता हवाई दलाने चीन आणि पाकिस्तान सीमेवर आपल्या लढाऊ विमानांची तैनाती वाढवली आहे.
पश्चिम आणि उत्तर सीमांच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी हवाईने आघाडीवरील हवाई तळानां पूर्णपणे सज्ज ठेवले आहे. या हवाई तळांवरुन काही दिवसांपासून रात्री किंवा दिवसा काही लढाऊ विमानं आकाशात उडताना दिसून येत आहेत.
तेजस लढाऊ विमानाची वैशिष्ट्ये
ताशी २२२२ किमी वेगाने उड्डाण करण्यास सक्षम आहे. एकावेळी ३००० किमी अंतर उड्डाण करू शकते. ४३.४ फूट लांब आणि १४.९ फूट उंच आहे तेजस लढाऊ विमान. शस्त्रास्त्रांसह १३,५०० किलो वजन आहे.
विमानावर ६ प्रकारची हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र तैनात केली जाऊ शकतात. डर्बी, पायथन -5, आर -73, अस्त्र , असराम, मेटियॉर. दोन प्रकारची एअर-टू-ग्राउंड क्षेपणास्त्रे म्हणजे ब्रह्मोस-एनजी आणि डीआरडीओ अँटी-रेडिएशन क्षेपणास्त्रे आणि ब्रह्मोस-एनजी जहाजविरोधी क्षेपणास्त्रे. याशिवाय लेझर गाईड बॉम्ब, ग्लाइड बॉम्ब आणि क्लस्टर शस्त्रे बसवली जाऊ शकतात.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
I used to be able to find good info from your blog posts.
Good one! Interesting article over here. It’s pretty worth enough for me.
Thanks so much for the blog post.
I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.
Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.