बीड: सख्या चुलत भावाने आपल्या बहिणीला पळवून नेल्याची संतापजनक घटना युसुफ वडगाव पोलीस ठाणे अंतर्गत घडली आहे. याआधी या चुलत भावावर आपल्या बहिणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, आता त्याने अल्पवयीन असलेल्या बहिणीला चक्क पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.

याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धारूर तालुक्यातील एका गावाततील अवघे साडे सतरा वय असलेली दहावीत शिकणारी मुलगी ही आपल्या मामाकडे अंबाजोगाई तालुक्यात असलेल्या युसुफ वडगाव आणि केज पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या मामाच्या गावी आपल्या आजोळी आली होती. काही दिवस या ठिकाणी ती राहिली मात्र ३१ मे रोजी ही मुलगी घरात कुठेही आढळून आली नाही.

यामुळे मुलीच्या मामाने तिच्या आई-वडिलांना या गोष्टीची माहिती दिली. त्यानंतर तिचा सर्वत्र शोध घेतला मात्र ती कुठे आढळून आली नाही. यानंतर आई-वडिलांच्या फिर्यादीवरून त्यांच्याच पुतण्याने तिला कोणत्यातरी कारणाचे आमिष दाखवत पळवून नेल्याची तक्रार पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी पुतण्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Pune News: रिक्षाचालक कानाला कडकडून चावला, चव्हाणांच्या कानाचा लचकाच लुटला, पुण्यातील भयंकर घटना

मात्र, या पुतण्यावर चार महिन्यापूर्वी अल्पवयीन बहिणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर चार महिन्यानंतर आपल्या चुलत बहिणीला त्याने पळवून नेल्याची घटना समोर आली. चुलत बहिणीवरच लैंगिक अत्याचार करून आणि तिला पळवून नेल्यामुळे गावातील लोकांना एक वेगळाच धक्का बसला आहे.

याप्रकरणी धारूर आणि केज पोलीस त्यांचा शोध घेत असून पुढील तपास करत आहेत. दिवसेंदिवस अनेक अल्पवयीन मुलींचे अपहरण पळवून नेण्याचे प्रकार वाढत चालले आहेत त्याला नेमकं जबाबदार कोण? यासाठी अल्पवयीन मुलींना बाहेर शिकण्यासाठी पाठवताना त्यांच्यावर पालकांनी लक्ष ठेवने गरजेचं असल्याचं पोलीस प्रशासनाने आवाहन केले आहे. मात्र, जिल्हाभरात या घटनेने खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here