बालासोर : ओडिशा राज्यातील बालासोर जिल्ह्यात शुक्रवारी तीन रेल्वेंचा अपघात झाला. शालिमार-चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्स्प्रेस घसरुन मालगाडीला धडकली. त्यानंतर बेंगळुरू-हावडा एक्स्प्रेस धडकून रुळावरून घसरल्याने अपघात झाला. या अपघातात २८८ जणांनी जीव गमावला. ८०३ जण जखमी झाले आहेत. या अपघातानंतर रेल्वेकडून बचावकार्य सुरु करण्यात आलं. रेल्वे विभागाकडून आता रेल्वे ट्रॅक पूर्ववत करण्याच काम सुरु करण्यात आलं आहे. अपघातामध्ये बचाव कार्य करणाऱ्या पथकाला प्रवाशांचं साहित्य आढळलं आहे. बचाव कार्य करणाऱ्या पथकाला एक नोटबुक आढळली आहे.

बहनगा बाजार स्थानकावर बचावकार्य करणाऱ्या पथकाला नोटबुक आढळलीय. त्यामध्ये वहीमधील डाव्या बाजूच्या पानांवर लाल, निळ्या, हिरव्या आणि जांभळ्या रंगानं चित्र रेखाटलेली आहेत. तर उजव्या बाजूच्या पानांवर प्रेमकविता लिहिलेल्या होत्या. बहनगा स्थानकाजवळी रुळांवर प्रवाशांचं साहित्य अस्ताव्यस्त पडलेलं होतं.

नोटबुकमध्ये ओल्पो ओल्पो मेघ टेके ब्रिष्टी सृष्टी होई, छोट्टो छोट्टो गोल्पो ठेके भलोबशा सृष्टी होई या बंगाली भाषेतील कवितेच्या ओळी आहेत. त्याचा मराठीत अर्थ छोट्या छोट्या ढगांतून पावसाची निर्मिती होते, छोट्या गोष्टींमधून प्रेमाची निर्मिती होते,असा होतो. ही नोटबुक कुणाची आहे, कवितांचा लेखक कोण आहे हे मात्र समोर आलं नाही. यातील कविता नेमक्या कुणासाठी लिहिलेल्या आहेत हे समोर आलं नाही. कविता या कविच्या प्रेमाबद्दलची भावना आणि तळमळ दिसून येते. मात्र, या कवितांचा कवी जिवंत आहे की नाही कुणीच सांगू शकत नाही.
Monsoon 2023 Update : मान्सूनची प्रतीक्षा संपली! आज केरळमध्ये वरूणराजा बरसणार, महाराष्ट्रात या तारखेला…

बचावपथकाला सापडलेली की नोटबूक ओडिशा रेल्वे अपघाताच्या शोकांतिकेचे प्रतीक म्हणून समोर आली आहे. रेल्वे ट्रॅकजवळ चपला, शूज, सुटकेस आढळल्या. काही सुटकेस, बॅगा उघड्या होत्या. काही कपडे फाटलेल्या स्थिती तर काही कपड्यांना रक्त लागलेलं दिसून आलं. तर, अपघाताच्या ठिकाणी हात तुटलेली बाहुली देखील आढळली.
Nashik News: अजित पवारांविषयी जे बोललो त्याविषयी खेद व्यक्त करतो; संजय राऊतांची तलवार म्यान
रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी आणि स्वंयसेवकांनी शनिवारी बचावकार्य केलं. रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी बचावकार्य करताना जेवढं वाचवता येईल तितक वाचवण्याचा प्रयत्न केला. रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचे प्रयत्न वाहतूक पूर्ववत करण्यासाठी सुरु आहेत.
Weather Alert: राज्यासाठी पुढचे ३-४ तास महत्त्वाचे; मुंबई, ठाण्यासह १२ जिल्ह्यांना IMD कडून पावसाचा इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here