कोल्हापूर : आपण सर्वांनी जुडवा पिक्चर तर पाहिलाच असेल. यामध्ये दोन जुळ्या भावांची आवडनिवड आणि वागणं हे सारखंच असतं. मात्र, हा सिनेमा तर काल्पनिक आहे. पण कोल्हापुरात एक घटना सत्यात उतरली आहे. दोन जुळ्या बहिणी ह्या दिसायलाही एकसारख्या तर आहेतच त्यांची आवडनिवड, सवयी, चालणं-बोलणंही सारखं आहे. दरम्यान, दहावीच्या परीक्षेतही त्यांना मार्क्स देखील सेमच पडले आहेत. हे ऐकल्यावर तुम्हालाही नवल वाटेल पण हे खरं आहे. कोल्हापुरातील उषाराजे हायस्कूलमधील पुण्यदा आणि भाग्यदा या जुळ्या बहिणी आहेत. दोघी जुळ्या असल्याने दिसायला ही सेम टू सेम आणि शिकायलाही एकाच शाळेत आणि एकाच वर्गात आहेत.

बहुतेकदा अगदी शिक्षक ही बुचकळ्यात पडतात, नेमकी पुण्यदा कोण आणि भाग्यदा कोण? दोघेही अभ्यासात हुशार आहेतच. सोबत विविध कलागुणात पारंगतही आहेत. आई बाबांचे योग्य ते अभ्यासासाठी नेहमी त्यांना पाठबळ आणि मार्गदर्शन मिळालं आहे. दोन्ही जुळ्या बहिणी घरातील लाडक्या असल्याने दोघींना ही सारखीच खेळणी, कपडे त्यांना घेतले जातात. त्यामुळे अभ्यासासाठी एकमेकींची साथ सोबत असल्याने दोघींनी जोमाने अभ्यास करून दहावीच्या परीक्षेत ९७.४० टक्के असे समान गुण मिळवले तर तीन विषयांमध्ये दोघींना सारखेच गुण मिळालेत.

Weather Alert: राज्यासाठी पुढचे ३-४ तास महत्त्वाचे; मुंबई, ठाण्यासह १२ जिल्ह्यांना IMD कडून पावसाचा इशारा
उषाराजे हायस्कूलमध्ये पुण्यदा आणि भाग्यदा यांनी आठवीपर्यंत मराठीतून शिक्षण घेतले. त्यानंतरच सेमी इंग्लिशमध्ये प्रवेश घेतला. योग्य अभ्यास, पुरेपूर वेळेचा वापर त्याच बरोबर आपले छंद जोपासत टेन्शन न घेता दहावीची परीक्षा दिली. जुळ्या मुलींनी सारखेच गुण मिळवत कमाल केली. तसेच दोघींनीही सारखेच मार्क्स मिळवण्यासोबतच शाळेत दुसरा क्रमांक पटकावला आहे. याचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच त्यांच्या पालकांनाही मुलींनी केलेल्या कामगिरीचा अभिमान आहे.

Kolhapur Airport: कोल्हापूर विमानतळाचे नाव ठरले, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी केली मोठी घोषणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here