चंद्रपूर : भरधाव वेगात असलेल्या एका कारचा आणि खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. कारने या बसला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा समोरील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला. या भीषण अपघातात कारमधील पाच जणांचा जागीच करुण अंत झालाय.

हा भीषण अपघात चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड – नागपूर मार्गावरील कान्पा गावाजवळ घडला. अपघातातील गंभीर जखमींना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आलं आहे. मृतांमध्ये लहान मुलगी आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. तर दोन महिला आणि एका पुरुषाचा मृतांमध्ये समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच नागभीड पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. जेव्हा मृतकांना कारमधून बाहेर काढत होते, तेव्हा उपस्थितांचे डोळे पाणावले.

ऑस्ट्रेलियाला तगडा झटका! प्रमुख वेगवान गोलंदाज WTC फायनलमधून आऊट; टीम इंडियासाठी ठरलेला डोकेदुखी
पुढील बातमी अपडेट होत आहे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here