लखनऊ: उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये मधुचंद्राच्या दिवशी सकाळी वधू आणि वर दोघेही त्यांच्या खोलीत बेडवर मृतावस्थेत आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली होती. यानंतर लग्न घरात एकच गोंधळ उडाला होता. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास केला. पोलिसांनी दोघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन ते शवविच्छेदनासाठी पाठवले. या दोघांचता शवविच्छेदन अहवाल समोर आला असून त्यामध्ये या दोघांच्या मृत्यूचं धक्कादायक कारण पुढे आलं आहे. शवविच्छेदन अहवालानुसार वधू-वराचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असल्याची माहिती समोर आहे. शवविच्छेदानंतर नवविवाहित जोडप्यावर एकत्रच अंत्यसंस्कार करण्यात आले.मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील कैसरगंज पोलीस स्टेशन हद्दीतील गोधिया नंबर चार गावातील २२ वर्षीय प्रताप यादवचे ३० मे रोजी परिसरातील मंगल मेळा गावातील मुलीशी लग्न झाले होते. मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने ३१ मे रोजी प्रतापने आपल्या नवरीला घरी आणले. घरातील महिलांनी मंगल गीते गाऊन नव्या नवरीचे स्वागत केले. रात्री उशिरापर्यंत घरात जल्लोष सुरू होता.दुसऱ्या दिवशी म्हणजेच सकाळी हे दोघे खोलीतून बाहेर आले नाहीत. वारंवार आवाज देऊनही त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर नेमकं काय झालं हे पाहण्यासाठी प्रतापचा लहान भाऊ खिडकीतून आत शिरला. तेव्हा त्याला दोघांचे मृतदेह बेडवर आढळून आले. ही घटना कळताच घरात एकच गोंधळ उडाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोघांचेही मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी पाठवले. दोघांचा मृत्यू कसा झाला हे नातेवाईकांना समजू शकले नाही.पती-पत्नीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूआता पोस्टमार्टममधून दोघांच्या मृत्यूचे कारण समोर आले आहे. एसपी प्रशांत वर्मा यांनी सांगितले की, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये पती-पत्नी दोघांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
Home Maharashtra Newly Married Couple: मधुचंद्राच्या रात्री बेडवरच कपलचा मृत्यू, कसा कुणाला कळेना? अखेर...