रत्नागिरी : जमिनीवरून अनेकदा टोकाचे वाद होण्याचे प्रसंग घडत असतात. कोकणातही जमिनीवरून आपापसात मतभेद असण्याचे प्रमाण मोठे आहे. असाच एक प्रकार चिपळूण येथे घडला आहे. जमिनीच्या वादावरूनच मामा कडून भाच्यालाच मारहाण करत भाच्याच्या नाकाचे हाडच फॅक्चर करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या सगळ्या घटनेची तक्रार चिपळूण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

चिपळूण शहरातील पाग बौद्धवाडी परिसरात येथील एका जाधव कुटुंबात जमिनीवरून आपापसात पूर्वीपासून वाद आहेत. हा वाद चार दिवसांपूर्वी विकोपाला गेला. त्या प्रकरणी संशयित आरोपी मुकेश काशीराम जाधव या मामाने आपल्या भाच्यालाच चक्क नाकावरती फाईट मारून त्याच्या नाकाचे हाडच फ्रॅक्चर केले. तसेच अन्य तीन जणांनीही त्याला हाताने आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच या सगळ्यांनी त्याच्या घरामध्ये विटा फेकून मारुन घरामध्येही मोठे नुकसान केले म्हणून, या सगळ्याची फिर्याद चिपळूण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांचं निधन, ९४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
या मारहाण प्रकरणी संशयित आरोपी मुकेश काशिराम जाधव, करण मुकेश जाधव, मुकेश सुरेश कांबळे, योगेश सुरेश कांबळे या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भा.द.वि. ३२५, ३२३, ४२७, २४ प्रमाणे संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार मारहाणीचा प्रकार ३१ मे रोजी सकाळी अकरा वाजता वाघ बौद्धवाडी येथे घडला आहे. या प्रकरणी चिपळूण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास चिपळूण पोलीस करत आहेत.

फेसबुकवरील प्रेम ‘लिव्ह इन’पर्यंत आलं, संशयाचं भूत डोक्यात शिरलं, एकाच वादात सगळं संपवलं!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here