मुंबई: सुलोचनाबाईंनाही यांच्या करिअरची सुरुवात ही भालजी पेंढारकर यांच्यामुळं झाली. त्यांच्या ‘जयभवानी’ चित्रपटात त्या पहिल्यांदा नायिका झाल्या. प्रारंभीच्या काळात त्यांना शुद्ध मराठी नीटसे बोलता येत नव्हतं. पण भाषेच्या न्यूनगंडापोटी त्या दबून गेल्या नाहीत. कॅमेऱ्याला कसे सामोर जावं याचे धडे त्यांनी भालजी आणि राजा परांजपे या बुजुर्ग दिग्दर्शकांकडं घेतले. राजा परांजपे यांच्या ४८ सालच्या ‘जीवाचा सखा’ या चित्रपटात सुलोचनाबाई नायिका झाल्या. ग. दि. माडगुळकर, सुधीर फडके आणि राजा परांजपे हे मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारे त्रिकूट प्रथम एकत्र आले ते याच चित्रपटात.

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांचं निधन, ९४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
इथून पुढचं ‘बाळा जो जो रे’, ‘मी तुळस तुझ्या अंगणी’, ‘चिमणी पाखरं’, ‘भाऊबीज’, ‘प्रपंच’, ‘वहिनीच्या बांगड्या’ हे त्यांच्या प्रमुख भूमिका असलेले चित्रपटही यशस्वी झाले. पहिल्या महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात ‘प्रपंच’मधील भूमिकेसाठी त्यांना सवोर्त्कृष्ट अभिनेत्रीचं पारितोषिक मिळालं होतं. ‘मोलकरीण’ आणि ‘एकटी’मधल्या त्यांच्या सोशिक आईनं या सर्वांवर कळस चढवला. हिंदी पडदाही त्यांनी आपल्या सोज्वळ भूमिकांनी गाजवला. त्यांना दीदी हे बिरुद चिकटलं ते तिथंच. त्या सर्वसामान्य रसिकांच्या मनात घर करून राहिल्या त्या बहीण, वहिनी, आई अशा रूपाततल्या भूमिकांमुळं.

दुर्गाबाईंचं खानदानी तेज, करारीपणा, उषा किरण यांचा घरेलू साधेपणा, सीमा यांची स्नेहार्दता आणि आशा काळेंची पराकोटीची सोशिकता ही त्या त्या अभिनेत्रींची असलेली वैशिष्ट्ये सुलोचनाबाईंच्या ठायी एकाचवेळी प्रकट होत होती. त्यांच्या रूपानं समस्त गृहिणींना आपलं रूपच पडद्यावर साकारतं आहे असं वाटायचं आणि पुरुषांना आपल्या मनातील आदर्श स्त्री प्रकटली आहे असं वाटायचं. एखाद्या कलावंताबद्दल असं आतून बंध निर्माण होणं हे दुमीर्ळ असतं. सुलोचनाबाईंची जादू त्यांनी चित्रपटांतून काम करण्याचं थांबविल्यावर अनेक वर्षांनंतरही तशीच होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here