वाऱ्याचा वेग इतका होता की ग्रामीण भागात बऱ्याच घरांवरील पत्रे उडाले. जनावरांचे गोठे पडले, रस्त्यावरील होर्डिंग्ज व झाडे जमीनदोस्त झाली. जाफराबाद तालुक्यातील टेंभूर्णीसह परिसरात दुपारी अचानक वातावरणात बदल होऊन ढगाळ वातारण तयार झाले होते. व नंतर २ वाजेच्या सुमारास वादळीवाऱ्याने झाडासह लाईट चे पोल देखील आडवे केलेले बघायला मिळत आहे. सध्या स्थितीत परिसरातील शेतकऱ्यांची शेतीच्या कामाची लगबग सुरू असून नागरणी, वखर पाळी, रोट्याव्हेटर सह पेरणी पूर्व मशागतीची आदी कामे सुरू आहे.
अशातच अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याची तारांबळ उडाली होती. यावेळी शेतातील जनावरांचा चारा, भुसावरील ताडपत्री, गोठ्यावरील पत्रे, शेतातील मिरची लागवडीसाठी आंथरण्यात आलेली मलचींग इत्यादी वास्तूची दाणादाण उडाली आहे.

समृद्धी महामार्गावर वाहतूक कोंडी
समृद्धी माहामार्गावर कमान कोसळली, वाहतुकीचा झाला खोळंंबा
समृद्धी महामार्गावर वाहतुकीचा मोठा खोळबा झाला आहे.जालन्यात वादळी वाऱ्यामुळं समृद्धी महामार्गावरील कमान कोसळल्याची घटना घडली आहे.आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जालना जिल्ह्यात अचानक वातावरणात बदल झाल्याने वादळी वाऱ्याला सुरुवात झाली.या वेगाच्या वाऱ्यामुळे समृद्धी महामार्गावरील कमान तुटून पडल्यामुळे समृद्धी महामार्ग बंद झाला असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत त्यामुळे वाहन धारकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.
या घटने नंतर अजून कुठला खोळंबा होऊ नये यासाठी समृध्दी वरील पोलिस पथकाने दक्षता घेतली आहे.पोलिसांनी स्थानिक कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही कमाल हटविण्याचे काम सुरू केले आहे. ही कमान अवजड असल्याने ही कमान हटवण्यासाठी क्रेन मागवण्यात आला आहे.परंतु या सगळ्या कामामुळे वाहनांच्या लांबच रांगा लागल्या असून काय झाले हे बघण्याच्या उत्सुकतेने प्रवासी वाहनातून बाहेर पडून रस्त्यावर आले आहेत. अनेक जण वाहतुकीची कोंडी कशी फोडता येईल, याचा मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत. रस्त्यावर वाहनचालक आणि प्रवासी जमल्याचे दिसून येत आहे.