जळगाव: खासगी बस उलटून भीषण अपघात घडला आहे. यामध्ये अंदाजे २४ प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. जळगाव-धरणगाव महामार्गावर ही धक्कादायक घटना घडली असून या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. पाळधी गावाजवळ हॉटेल सुगोकीजवळ रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघात घडला त्यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील हे आपल्या पाळधी येथील निवासस्थानी जात होते. यावेळी त्यांनी आपली गाडी थांबवून तात्काळ जखमी प्रवाशांना रुग्णालयात हलविण्यासाठी यंत्रणा हलवली. रुग्णवाहिकेला बोलवून जखमींना रुग्णालयात रवाना केले. अपघातात २४ जण जखमी झाले असून जळगाव जिल्हा रुग्णालयात १७ जखमींना आणण्यात आले आहे.

अकोला येथून खाजगी बस क्रमांक जीजे १८ बीव्ही ३०४२ ही अहमदाबाद येथे जात होती. प्रवासात धरणगावकडे जाणाऱ्या महामार्गावर पाळधी गावानजीक असलेल्या सुगोकी हॉटेलजवळील महामार्गावर रात्री ८ वाजेच्या सुमारास बस अचानक रस्त्याच्या कडेला उलटली. अपघातात २४ जण जखमी झाले असून जळगाव जिल्हा रुग्णालयात २२ जखमींना आणण्यात आले आहे.

Odisha Accident: कोरोमंडल १२८ च्या वेगाने धडकली अन् डबे पत्त्यासारखे विखुरले; रेल्वेने सांगितलं अपघाताचं कारण
पालकमंत्री गुलाबराव पाटील हे देखील रात्री याच रस्त्याने वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आपल्या निवासस्थानी जात असतांना त्यांना अपघातग्रस्त ट्रॅव्हल्स दिसून आली. पालकमंत्री यांनी लागलीच आपल्या वाहनांचा ताफा थांबवित लक्झरीमधून जखमींना बाहेर काढून रुग्णवाहिकेला पाचारण केले. पालकमंत्री आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जैन कंपनीच्या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून त्यांनी रुग्णालयात दाखल केले आहे.

ओडिशामध्ये कोरोमंडल रेल्वेचा भीषण अपघात, २०० प्रवाशांनी जीव गमावला तर ९०० हून अधिकजण जखमी

घटनास्थळी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते मदतकार्य करीत आहे. जिल्हा रुग्णालयात सध्या २२ जखमींना आणण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर दोन जखमींना इतर रुग्णालयात नेण्यात आलं आहे.

नको जाऊ गं… बापाने पाया पडल्या, विनवण्या केल्या, पण त्या निष्ठुर पोरीने काही ऐकलं नाही, अन्… पाहा VIDEO

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here