सोमवारी चीनचा अभ्यास असणाऱ्या चायना स्टडी ग्रुपची महत्वाची बैठक झाली. या बैठकीत चीनच्या लडाखमधील कारवाया, तसेच तिबेटच्या अक्साई चीन भागात पीएलएकडून होत असलेली कुरघोडी या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. चायना स्टडी ग्रुपमध्ये वरिष्ठ मंत्री, नेते आणि नोकरशहांचा समावेश आहे, असे हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
चीन काही केल्या आपल्या भूमिकेपासून माघार घेण्यास तयार नसल्याचे दिसते. सीमेवर असलेली स्थिती भारताने मान्य करावी आणि मुत्सद्दी पातळीवर दोन्ही देशांमधील संबंध सामान्य करावेत असे चीनला वाटते. मात्र, लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ पूर्वीसारखी पूर्वी होती तशी स्थिती होणे गरजेचे असून त्यात थोडाही बदल भारत मान्य करणार नाही, अशी ठाम भूमिका भारत सरकारने घेतली आहे. मात्र, लडाखमधल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेबाबतच्या दोन्ही देशांना मान्य अशा धारणेनुसार आमचे सैन्य आमच्या हद्दीत आहे, असे चीनचे म्हणणे आहे.
चीनचा पवित्रा पाहता भारतीय सैन्याने लडाखमध्ये १५९७ किलोमीटरच्या सीमा रेषेवर फॉरवर्ड पोझिशन्सवर राहणार आहे. भारत-चीन देशाच्या विशेष प्रतिनिधींमध्ये ५ जुलै रोजी तणावाबाबत दोन तासापेक्षा अधिक काळ चर्चा झाली. दोन्ही बाजूंकडील सैन्य मागे हटवले जाईल यावर दोन्ही देशांनी एकमत दर्शवत बैठकीत तसा निर्णय घेतला. मात्र चीनने दिलेला शब्द पाळला नसल्याचे स्पष्ट झाले. शेवटी पँगाँग टीएसओ मधून चीनने आपले सैनिक मागे हटवले नाहीत. त्यामुळे तणावाची स्थिती कायम राहिली. या स्थितीचा विचार करता भारतीय सैन्याने हिवाळयातही तिथे राहण्याची व्यवस्था केली आहे.
वाचा-
आता चीन आपल्या शब्दाप्रमाणे वागत नसल्याचे पाहून भारताने चीनच्या आर्थिक नाड्या आवळण्याचा विचार सुरू केला आहे. बैछकांमध्ये सहमती दर्शवायची आणि बैठकीनंतर मात्र येरे माझ्या मागल्या करायचे ही चीनीच नीती भारताच्या लक्षाच आलली आहे. चीनच्या या दुटप्पी वागणुकीला शह देण्यासाठी भारताने आता आर्थिक आघाडीवर चीनला मोठा दणका देण्याची तयारी सुरू केली आहे. भारताने यापूर्वी अनेक चीनी अॅपवर बंदी घातली आहे. आता भारत नेमके काय पाऊल उचलतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
वाचा-
वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times