मंगळवारी सकाळपासून पावसाचा जोर ओसरला आहे. धरण क्षेत्रातही पाऊस पडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे राधानगरी धरणाचे दोन दरवाजे बंद झाले आहेत. सध्या केवळ दोनच दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सोमवारी पंचगंगा नदीच्या पाण्याने इशारा पातळी ओलांडली होती. आज पाण्याची पातळी वाढली नसली तरी ती कमी झाली नाही. त्यामुळे अजूनही धोका कायम आहे. संभाव्य महापुराचा धोका लक्षात घेऊन प्रयाग चिखली, आंबेवाडी यासह अनेक गावातील लोकांनी कालच सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले.
वाचाः
आज दिवसभर पाऊस कमी असल्याने जनजीवन सुरळीत झाले आहे. अजूनही जिल्ह्यातील बहुसंख्य नद्या दुथडी भरून वाहत आहेत. यामुळे अद्याप ८५ धरणे पाण्याखाली आहेत. काही रस्त्यावर पाणी आल्यामुळे वाहतूक बंद झाली आहे. पंचगंगा आणि कृष्णा या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे नरसिंह वाडी येथील दत्त मंदिर पूर्णपणे पाण्याखाली बुडाले आहे. येथील काही घरात पुराचे पाणी घुसले असून मिठाई दुकानदारांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले आहे. या पार्श्वभूमीवर पावसाचा जोर ओसरला असला तरी नद्यांच्या पाणी पातळीत घट न झाल्याने महापुराचा धोका अजूनही कायम आहे.
वाचाः
वाचाः
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times