म. टा. प्रतिनिधी, मुंबई :महाराष्ट्रात इतर मागासवर्गीयांची (ओबीसी) जातगणना झाल्यास बहुजन समाजातील अठरापगड जातीतील नागरिकांचे प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. परंतु जातनिहाय गणना करण्याचे सत्ताधारी भाजप टाळत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. जातनिहाय जनगणना करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सतत लावून धरली पाहिजे, असेही या नेत्यांनी नागपूर दौऱ्यात म्हटले आहे.

सार्वत्रिक जनगणनेत जातनिहाय गणना केली पाहिजे. यामुळे ओबीसींची नेमकी लोकसंख्या कळण्यास मदत होईल. कुठल्याही घटकावर अन्याय होणार नाही. अठरापगड जातींना सोबत घेऊन जाण्याची आमच्या पक्षाची भूमिका आहे, असे पवार म्हणाले. आगामी काळात विदर्भात राष्ट्रवादीची ताकद वाढली पाहिजे. महाराष्ट्राचे शिल्पकार, माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी व्यापक समाजहिताचे राजकारण केले. तेच राष्ट्रवादीला अभिप्रेत आहे. भविष्यात सत्ताकारणात नवे चेहरे देण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा लोकांच्या संपर्कात राहावे, असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांचं निधन, ९४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
राज्यात बेरोजगारीची मोठी समस्या आहे. मोठी गुंतवणूक, रोजगार देणारे उद्योग राज्याबाहेर निघून गेले. केंद्र व राज्यात भाजपचे सरकार आहे. देवेंद्र फडणवीस हे आता उपमुख्यमंत्री आहेत. पाच वर्षे ते मुख्यमंत्री होते. मिहानचा गतिमान विकास करण्यास राष्ट्रवादीचा नेहमी पाठिंबा राहील असेही पवार म्हणाले. राज्यात भ्रष्टाचार बोकाळला असूनही मुख्यमंत्री शिंदे हे ४० आमदारांना सांभाळण्यात व्यग्र आहेत. राज्यातील इतर समस्यांकडेही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यायला हवे, असे त्यांनी नमूद केले.
WTC Final : विराटमुळं ऑस्ट्रेलियाचं टेन्शन वाढलं, कोहलीविरोधात प्लॅनिंग सुरु,पाँटिंगनं दिला इशारा

गाफील राहू नका…

गद्दारी करणारे नेते निवडणुकीत जिंकून येत नाहीत, हे कर्नाटक विधानसभा निवडणुकीत दिसून आले. जे काँग्रेसमधून बाहेर पडले होते ते सर्व हरले. शिवसेनेतून गद्दारी करून बाहेर पडलेले आमदार हे पुढील निवडणुकीत निवडून येण्याची शक्यता नाही. परंतु आपणही गाफील राहून चालणार नाही, असे ते म्हणाले. भाजप जातनिहाय जनगणना टाळत आहे. भाजपकडून ओबीसी नेत्यांच्या लक्ष्य केले जात आहे, असा आरोप जयंत पाटील यांनी केला.
संपूर्ण देश हादरवणाऱ्या ओडिशातील रेल्वे अपघातामागे घातपात? आता होणार सीबीआय चौकशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here