India Monsoon Update : यंदाचा मान्सून लांबला आहे. केरळमध्ये (Kerala Monsoon Update) पाऊस सुरु होण्याची तारीख लांबली आहे. भारतीय हवामान खात्याने आता मान्सून तीन ते चार दिवस उशीराने दाखल होण्याचा अंदाज वर्तवला आहे. केरळमध्ये 4 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. पण अद्याप केरळमध्ये मान्सून दाखल झालेला नाही. त्यामुळे महाराष्ट्रातही मान्सूनची प्रतिक्षा लांबली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण-पश्चिम मान्सून आता लक्षद्विपपर्यंत पोहोचला आहे. केरळमध्ये मान्सून तीन ते चार दिवस उशिराने येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रतिक्षा लांबली असून सर्वसामान्यांनाही आणखी काही दिवस उन्हाची झळ सोसावी लागणार आहे.

केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची तारीख लांबली

साधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून केरळमध्ये दाखल होतो. भारतीय हवामान विभागाने (IMD) सांगितलं की, मे महिन्याच्या मध्यापासून ते 4 जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये पोहोचेल. पण केरळमध्ये मान्सून दाखल होण्याचा अंदाज चुकला आहे. हवामान विभागाने रविवारी एका निवेदनात म्हटलं आहे की, दक्षिण अरबी समुद्रावरील पश्चिमेकडील वाऱ्यांच्या वाढीमुळे परिस्थिती अनुकूल होत आहे. तसेच, पश्चिमेकडील वाऱ्यांची खोली हळूहळू वाढत आहे. 4 जून रोजी पश्चिमेकडील वाऱ्यांची खोली सरासरी समुद्रसपाटीपासून 2.1 किलोमीटरपर्यंत पोहोचली आहे. आग्नेय अरबी समुद्रावरील ढगांचे प्रमाणही वाढत आहे. पुढील तीन-चार दिवसांत केरळमध्ये मान्सून सुरू होण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण होईल अशी अपेक्षा आहे. 

महाराष्ट्रातही पाऊस लांबला 

केरळमध्ये 4 जूनला मान्सून दाखल होऊन महाराष्ट्रात 10 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. पण आता मान्सून तीन ते चार दिवस उशिराने येणार असल्याने महाराष्ट्रातही पावसाला विलंब होणार आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) रविवारी दिलेल्या माहितीनुसार, केरळमध्ये 7 ते 8 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात साधारणपणे 13 ते 15 जून दरम्यान पाऊस सुरु होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, पूर्व आणि ईशान्य, मध्य आणि दक्षिण भारतात 87 सेंटीमीटरच्या सरासरीच्या 94-106 टक्के सामान्य पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मान्सून लांबल्यामुळे एकूण पावसावर परिणाम नाही

दरम्यान, तज्ज्ञांनी सांगितलं आहे की, मान्सून लांबल्यामुळे खरीप पेरणीवर आणि देशभरातील एकूण पावसावर परिणाम होण्याची शक्यता नाही. दक्षिण-पूर्व मान्सून गेल्या वर्षी 29 मे रोजी, 3 जून 2021, 1 जून 2020, 2019 मध्ये 8 जून आणि 2018 मध्ये 29 मे रोजी दाखल झाला होता. भारतामध्ये एल निनोची परिस्थिती असूनही नैऋत्य मोसमी हंगामात सामान्य पाऊस पडण्याची अपेक्षा आहे, असे हवामान खात्याने याआधी सांगितलं होतं. वायव्य भारतात सामान्य ते सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

news reels Reels

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here