Mumbai Metro 3 : मुंबईतील मेट्रो ३ प्रकल्प नियोजित वेळेत सुरु होणार असल्याचं आश्वासन एमएमआरसीनं दिलं आहे. ‘जायका’नं सहकार्य केलेलं असल्यानं जपानी राजदूताकडून पाहणी करण्यात आली.

 

हायलाइट्स:

  • मुंबई मेट्रो ३ बद्दल नवी अपडेट
  • एमएमआरसीकडून अपडेट
  • जायकाचं सहकार्य
म. टा. खास प्रतिनिधी मुंबई : ‘मेट्रो ३’ ही भूमिगत मार्गिका वेळेतच सुरू होईल, असे आश्वासन मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) जपानच्या राजदूतांना दिले आहे. मुंबईच्या दौऱ्यादरम्यान जपानचे राजदूत हिरोशी सुझुकी यांनी या भूमिगत मेट्रोची पाहणीही केली.

‘मेट्रो ३’ ही मुंबईच्या पश्चिम उपनगरांना उत्तर-दक्षिण जोडणारी मार्गिका आहे. उत्तरेकडे आरे ते दक्षिणेकडे कफ परेडपर्यंत ही मार्गिका आहे. या ३३.५ किमी मार्गिकेचे भुयारीकरण पूर्ण झाले आहे. मार्गिकेवर एकूण २७ स्थानके आहेत. त्यातील २६ स्थानके भूमिगत आहेत. या स्थानकांची उभारणी सरासरी ८० टक्के पूर्ण झाली आहे. हा २३ हजार १३६ कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. त्यातील १३ हजार २३५ कोटी रुपयांचे वित्त साहाय्य जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्थेने (जायका) माफक व्याजदरावर देऊ केले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सुझुकी यांनी या भूमिगत मार्गिकेची पाहणी केली.
Monsoon : अरबी समुद्रात चक्रीवादळ? मान्सूनसाठी आणखी काही दिवस, पाहा हवामान विभागाचा अंदाज
हिरोशी सुझुकी यांच्यासह मंत्री (आर्थिक) क्योको होकुगो, जपानच्या मुंबईसाठीच्या महावाणिज्यदूत डॉ. यासुकाता फुकाहोरी तसेच भारतातील जपानच्या दूतावासातील उच्चस्तरीय शिष्टमंडळ आणि जायकाचे प्रतिनिधी यांचा यामध्ये समावेश होता. या शिष्टमंडळाने ‘मेट्रो ३’च्या बीकेसी स्थानकाला भेट दिली. त्यावेळी भुयारी मार्गाची पाहणी केली व कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला.
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी रस्सीखेच, भाजप मंत्र्यानं दबाव वाढवला, सेनेच्या मंत्र्याचं एक पाऊल मागे

जपानी शिष्टमंडळाकडून समाधान

या प्रकल्पाचा पहिला टप्पा आरे ते बीकेसी डिसेंबर २०२३ व दुसरा टप्पा धारावी ते कफ परेड असा डिसेंबर २०२४ मध्ये सुरू करण्याचे नियोजन आहे. यानुसार प्रकल्प नियोजित वेळेत व वेळापत्रकानुसार सुरू केला जाईल, असे आश्वासन ‘एमएमआरसी’च्या उच्चाधिकाऱ्यांकडून जपानी राजदूतांच्या शिष्टमंडळाला देण्यात आले. सुझुकी यांनी प्रकल्पाच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले, तसेच आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
अजित पवारांनी भाजपला अडचणीत आणणारा प्रश्न विचारत टेन्शन वाढवलं, कामाला लागण्यासाठी कार्यकर्त्यांना दिला मंत्र

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here