म. टा. प्रतिनिधी, पुणे: मास्कधारी तरूणांनी व्यापाऱ्यांना लुटल्याची घटना पुण्यात घडली आहे. या प्रकरणात दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर वानवडी भागातही वाइन शॉपचे शटर तोडून चोरट्यांनी मद्याचे बॉक्स केली. या चोरीच्या घटनेत सामील असलेल्या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. नागरिकांना तोंडाला मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, काही उपद्रवींकडून याचा गैरफायदा घेतला जात आहे. डेक्कन परिसरात दोन तरुणांनी व्यापाऱ्यांना लुटल्याची घटना घडली. हे दोन्ही तरूण सख्खे भाऊ असून, त्यांनी लुटीच्या वेळी तोंडाला मास्क लावला होता. डेक्कन पोलिसांनी या तरुणांना अटक केली आहे. दीपक किशोर चौधरी (वय ३०) आणि अभिजित किशोर चौधरी (वय १९, रा. सुंदरबन, मांगडेवाडी, कात्रज) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

वाइन शॉप फोडले; दारूचे बॉक्स पळवले

वानवडी भागातील कलाल वाइन्स शॉपचे शटर उचकटून दारूचे बॉक्स चोरी करणाऱ्या चौघांना गुन्हे शाखा युनिट-५ च्या पथकाने अटक केली. असिफ उर्फ काल्या आयुब शेख (वय २८ रा.म्हाडा कॉलनी, हडपसर), मोहसीन करीम सय्यद (वय ३१,रा.सय्यद नगर), हासिन इस्माइल मुल्ला (वय ३१, रा काळेपडळ हडपसर), आणि साहिल मेहबुब शेख ( वय १९, रा.म्हाडा कॉलनी, हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींकडून दोन मोटरसायकली, दोन मोबाइल, शटर तोडण्याचे साहित्य, साडेपाच हजारांची रोकड, २२ हजार रुपये किंमतीचे तीन दारूचे बॉक्स असा ९५ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here