धुळे : महावितरण सबस्टेशनच्या कार्यालयात कार्यरत असलेले सिनिअर ऑपरेटर यांचा तापी नदीपात्रात मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत्यूआधी त्यांनी व्हॉट्सअप ग्रुपवर मॅसेज टाकला होता. ज्यात त्यांनी म्हटलं की, “माझ्या मागे ४ ते ५ गुंड मुलं लागले असून हे सर्व अनोळखी आहेत. मला काहीच सुचत नाहीये. माझ्या सोबत ३ लाख रूपये आहेत. मी कसा तरी स्व:ताला वाचवण्याचा प्रयत्न करत असून मला मदत करा” असा त्यांनी मॅसेज टाकला होता आणि त्याच्या दोन तासानंतर नदीपात्रात त्यांचा मृतदेह आढळून आला आहे.शिरपूर तालुक्यातील बाळदे ता. शिरपूर येथील सबस्टेशन इथं प्रवीण विजय गवते वय ४२ रा.चिमठाणे ता. शिंदखेडा इथे सिनीअर ऑपरेटर म्हणून कार्यरत होते. त्यांची काल दुपारी गिधाडे तापी नदी पुलावर मोटरसायकल बेवारस स्थितीत आढळून आली होती. प्रवीण गवते यांची रात्रपाळी असल्याने ते रात्रीपासून बाळदे येथील सबस्टेशनवर होते. सकाळी ८:३० वाजता ते घरी चिमठाणे इथे जाण्यासाठी निघाले होते. मात्र २ वाजून ५२ मिनिटांनी त्यांनी व्हॉट्सअप ग्रुपवर एक मॅसेज टाकला. ज्यात आपल्याकडे ३ लाख असून काही गुंडही मागे लागल्याचं त्यांनी सांगितलं. ग्रुपमधील मेसेज वाचून त्यांना संपर्क देखील साधण्यात आला होता.

Crime News: रेस्टॉरंटमध्ये ८० लोकांचा घोळका बसला होता, पोलिसांना संशय; गुपचूप गेले अन् पाहताच फुटला घाम…
या घटनेनंतर त्यांची मोटरसायकल गिधाडे तापी पुलावर आढळून आली होती. त्यांचा गिधाडे तापी नदीपात्रात शोध सुरु केला असता प्रवीण गवते यांचा तापीनदी पात्रात मृतदेह आढळून आला. पोलिसांनी तातडीने मृतदेह ताब्यात घेऊन तो शिंदखेडा येथील रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला. मयत प्रवीण गवते यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरील मेसेजमुळे अनेक तर्कवितर्क लावण्यात येत असून याप्रकरणात पोलीस काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

Shocking News: लग्न ठरलं पण वजन ९५ किलो होतं, वेट लॉस सर्जरीसाठी गेली अन् तासाभरात मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here