म. टा. वृत्तसेवा, चिपळूण : मागील अनेक दिवसांपासून उत्सुकता लागून राहिलेल्या कोकण रेल्वे मार्गावरील ‘वंदे भारत एक्स्प्रेस’चा नियमित प्रवास लांबणीवर पडला आहे. ओडिशा येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातामुळे या गाडीचा उद्घाटन सोहळा आणि नियमित फेऱ्या तूर्तास लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत.कोकणातील वंदे भारतचे उद्घाटन ३ जूनला मडगाव येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हि़डिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार होते. मात्र, उद्घाटनाच्या पूर्वसंध्येला ओडिशामध्ये रेल्वेचा भीषण अपघात झाल्याने ते रद्द करण्यात आले. त्याच दिवशी रात्री उशिरा रिकामी गाडी मुंबईला नेण्यात आली. त्यामुळे मंजुरी मिळालेल्या वेळापत्रकानुसारच या गाडीची नियमित सेवा उद्घाटनाशिवाय आज, सोमवारपासून सुरू होईल, असे रेल्वे मंडळाकडून सांगितले जात होते. पण केंद्रीय रेल्वेमार्ग पथक व रेल्वेची मोठी यंत्रणा ओडिशात येथील अपघातात व्यस्त असल्याने तूर्तास या गाडीला रेड सिग्नल देण्यात आला आहे. त्यामुळे आता ती नेमकी कोणत्या तारखेला नियमित सेवेसाठी धावते, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

Mumbai Goa Highway: या कारणामुळे पावसाळ्यात परशुराम घाटात पुन्हा दरड कोसळू शकते; मंत्र्यांकडूनच धोक्याचा इशारा

ओडिशातील रेल्वे अपघातामुळे लोकार्पण रद्द

ओडिशातील रेल्वे अपघातामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्या आठवड्यात शनिवारी मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसचे करण्यात लोकार्पण रद्द करण्यात आले होते. मात्र, हा उद्घाटन सोहळा पुन्हा कधी होणार किंवा ही वंदे भारत एक्स्प्रेस प्रवाशांसाठी नियमित कधी धावणार याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. याबाबत लवकरच कोकण रेल्वे प्रशासनाकडून अधिकृतरित्या कळविण्यात येईल, असे कोकण रेल्वे प्रशासनातील सूत्रांनी सांगितले.

मुंबई-गोवा वंदे भारत सज्ज; कोकणवासीयांसाठी मोठ्ठं गिफ्ट, फक्त ७ तासांत होणार प्रवास सुकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here