मेलबर्न: अफगाणिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू राशिद खानच्या पाठोपाठ स्पर्धेत आणखी एका हॅटट्रिकची नोंद झाली. पाकिस्तानचा जलद गोलंदाज हारिस राउफने धमाकेदार गोलंदाजीकरत हॅटट्रिक घेतली. राउफच्या या कामगिरीमुळे स्पर्धेत एकाच दिवशी दोन हॅटट्रिक झाल्या.

मेलबर्न स्टार्सकडून खेळताना राउफने सिडनी थंडर्स संघाच्या तिघा फलंदाजांना बाद केले. मेलबर्न ग्राऊडवर झालेल्या या सामन्यात राउफने एकही विकेट घेतली नव्हती. पण अखेरच्या षटकांमध्ये त्याने मॅथ्यू गिलख्रिस्ट, कॅमल फर्ग्युसन आणि डेनियल सॅमस या तिघांना बाद केले. या सामन्यात राउफने चार षटकात २३ धावा देत चार विकेट घेतल्या.

वाचा-

मेलबर्न स्टार्सकडून १९च्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर राउफने गिलख्रिस्टला फाइन लेगवर झेलबाद केले. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर फर्ग्युसनला बोल्ड केले आणि चौथ्या चेंडूवर सॅम्सला LBW करत हॅटट्रिक केली. मेलबर्न संघाकडून हॅटट्रिक घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला.

सिडनी थंडर्स संघाने २० टकात ५ बाद १४५ धावा केल्या. मेलबर्न संघाने विजयाचे लक्ष्य चार विकेटच्या बदल्यात पार केले. मार्क स्टॉयनिसने ४४ चेंडूत ५० तर ग्लेन मॅक्सवेलने ३७ चेंडूत ५९ धावा केल्या.

राउफच्या आधी अफगाणिस्तानचा लेग स्पिनर याने हॅटट्रिक घेत पुन्हा एकदा सिद्ध केले की तो सध्याचा सर्वात धोकादायक फिरकीपटू आहे. त्याने सिडनी सिक्सर्सकडून खेळताना ही कामगिरी केली.

राशिद खानने सिडनीच्या डावात ११ व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर जेम्स विंस (२७) आणि सहाव्या चेंडूवर जॅक एडवर्ड्सला (०) बाद केले. पुढच्याच चेंडूवर म्हणजे १२ व्या षटकाच्या पहिल्या बॉलवर जॉर्डन सिल्कला (१६) बाद केले. विंसचा चेंडू एलेक्स कॅरीने झेलला, तर एडवर्ड्स पायचीत झाला. सिल्कला राशिदने त्रिफळाचीत केले आणि हॅटट्रिक आपल्या नावावर केली.

राशिदने जमैका थलाइवाजविरुद्ध २०१७ मध्ये कॅरेबियन प्रिमियर लीग टी-२० मॅटमध्ये हॅटट्रिक घेतली होती. त्याची टी-२० करिअरमधील ही तिसरी हॅटट्रिक आहे. तर बिग बॅश लीगमध्ये हॅटट्रिक घेणारा पहिला परदेशी खेळाडू ठरला. टी-२०मध्ये तीन वेळा हॅटट्रिक करणारा तो जगातील पाचवा खेळाडू आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here