मुंबई: बातमीदारीच्या नावाखाली बेजबाबदार बातम्या प्रसारित करणारे व महाराष्ट्र सरकारमधील मंत्र्यांवर कुठल्याही पुराव्याशिवाय बेछूट आरोप करणारे ” या वृत्तवाहिनीचे संपादक यांच्यावर तातडीनं कारवाई करा, अशी मागणी शिवसेनेचे खासदार यांनी राज्य सरकारकडे केली आहे. (Shivsena MP demands )

वाचा:

अरविंद सावंत यांनी गृहमंत्री यांना या संदर्भात एक सविस्तर पत्र लिहिलं आहे. त्यात त्यांनी अर्णब गोस्वामी यांच्याविरुद्ध अनेक तक्रारी केल्या आहेत. गोस्वामी यांनी पत्रकारितेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. एका मृत महिलेवरही त्यांनी आरोप केले आहेत. तिचे चारित्र्यहनन केले आहे. संबंधित महिलेच्या कुटुंबीयांनी आक्षेप घेतल्यानंतरही अर्णब गोस्वामी बधले नाहीत. प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाने पत्रकारिता व बातम्यांसंदर्भात घालून दिलेल्या मर्यादांचेही ते उल्लंघन करत आहेत. काही लोकांच्या स्वार्थासाठी बेजबाबदार बातम्या प्रसारित करून गोस्वामी हे समाजात तेढ निर्माण करीत आहेत. त्यामुळं राज्यात कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे,’ असं सावंत यांनी पत्रात म्हटलं आहे.

वाचा:

एखाद्या गुन्ह्यासंदर्भात कुठलाही पुरावा नसताना बातम्या प्रसिद्ध करणे हा त्या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या यंत्रणेच्या कामात व्यत्यय आणू शकतो व खऱ्या गुन्हेगाराला अप्रत्यक्ष मदत होऊ शकते. गोस्वामी यांच्या चॅनेलवरून जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींवर बेछूट आरोप केले जातात. पोलीस खात्याच्या प्रतिष्ठेलाही त्यांनी धक्का पोहोचवला आहे. एवढेच नव्हे तर, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करून त्यांना धमकावण्यापर्यंत अर्णब गोस्वामी यांची मजल गेली आहे. हा संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे. उभा महाराष्ट्र गोस्वामी आणि त्यांच्या चॅनेलवर कारवाईची वाट पाहतोय. त्यांच्यावर तातडीनं कारवाई करा, अशी आग्रही मागणी सावंत यांनी पत्राद्वारे केली आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here