CNG PNG Latest News : केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतल्याने सामन्यांना महागाईपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने CNG आणि PNG बाबत इंधन कंपन्यांना नवे दर लागू केले आहेत. याचा फायदा सामान्यांना होणार आहे.

केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाच्या पेट्रोलियम नियोजन व विश्लेषण सेलनुसार (पीपीएसी), मे महिन्यातील नैसर्गिक वायूचा दर ८.२७ डॉलर प्रति दशलक्ष युनिट (एमएमबीटीयू) इतका होता. तो जून महिन्यासाठी ७.५८ डॉलर प्रति दशलक्ष युनिट करण्यात आला आहे. यानुसार ग्राहकांपर्यंत नैसर्गिक वायू पुरवणाऱ्या कंपन्यांसाठी नैसर्गिक वायू ०.६९ डॉलर प्रति एमएमबीटीयूने स्वस्त झाला आहे. एक किलो नैसर्गिक वायूमध्ये ४६ हजार ४५२ युनिट असतात. त्यानुसार एमएमबीटीयूमध्ये २१.५३ किलो नैसर्गिक वायूचा समावेश होतो. प्रति एमएमबीटीयू नैसर्गिक वायू ०.६९ डॉलरने स्वस्त करण्यात आला आहे. या सर्व समीकरणांचा विचार केल्यास, नैसर्गिक वायू २.५६ रुपये प्रति किलोने स्वस्त झाला आहे. त्यानुसार आता नैसर्गिक वायूचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी सीएनजी व पीएनजी दरात कपात करणे अपेक्षित आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.