मुंबई: देशाचा १.९२ टक्क्यांवर आहे. मात्र, मुंबईत ऑगस्ट महिन्यात १७ दिवसांत मृत्यूदर ५.४० टक्क्यांवर गेला आहे, या गंभीर मुद्द्याकडे लक्ष वेधतानाच मुंबईत चाचण्या वाढविण्याची नितांत गरज असल्याची मागणी करणारे आणखी एक पत्र विरोधी पक्षनेते यांनी मुख्यमंत्री यांना पाठविले आहे. ( writes to )

वाचा:

‘सातत्याने आग्रह करून सुद्धा मुंबईत चाचण्यांची संख्या मर्यादित ठेवण्याचे कारण आता कळेनासे झाले आहे. मुंबईतील मृत्यूदर सातत्याने वाढत असल्यानेच पुन्हा एकदा आग्रह आहे की, मुंबईत चाचण्यांची संख्या तातडीने वाढविण्यात यावी. जुलै महिन्यात मुंबईमध्ये प्रतिदिन ६५७४ चाचण्या करण्यात आल्या आणि या महिन्याचा मृत्यूदर हा ४.९१ टक्के इतका होता. ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत (दि.१७ ऑगस्टपर्यंत) प्रतिदिन ७००९ चाचण्या करण्यात आल्या. या १७ दिवसांचा मृत्यूदर हा ५.४० टक्के इतका झाला आहे. मुंबईची एकूणच लोकसंख्या पाहता प्रतिदिन ७००० चाचण्या ही संख्या अतिशय कमी आहे. देशाचा मृत्यूदर आता १.९२ टक्क्यांवर आला आहे. असे असताना मुंबईचा मृत्यूदर सातत्याने ५ टक्क्यांच्या वर असणे हे अतिशय चिंताजनक आहे’, असे देवेंद्र फडणवीस यांनी पत्रात नमूद केले आहे.

वाचा:

महाराष्ट्राचा मृत्यूदर जून महिन्यात ५.२० टक्के इतका होता. तो जुलै महिन्यात २.८९ टक्के झाला आणि आता ऑगस्टच्या १७ दिवसांत तो २.८९ टक्के इतका पुन्हा कायम आहे. आतापर्यंतच्या एकूण सर्व आकडेवारीचा विचार करता महाराष्ट्राचा मृत्यूदर हा ३.३५ टक्के इतका आहे. सध्या देशातील संसर्गाचे प्रमाण हे ८.८१ टक्के इतके असून, ते महाराष्ट्रात १८.८५ टक्के, तर मुंबईत १९.७२ टक्के इतके आहे. एकीकडे संसर्गाचे प्रमाण अधिक आणि दुसरीकडे सातत्याने वाढणारा मृत्यूदर पाहता चाचण्यांवर अधिकाधिक लक्ष केंद्रीत करणे, रुग्ण ओळखणे, त्यातून विलगीकरण आणि अन्य नागरिकांना सुरक्षित ठेवणे हा एकमात्र उपलब्ध पर्याय असल्याने मुंबईत चाचण्या वाढविण्याची नितांत गरज आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रात म्हटले आहे.

वाचा:

दरम्यान, याआधीही देवेंद्र फडणवीस यांनी करोना साथीच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार केला आहे. करोना चाचण्यांची संख्या वाढवण्यासाठी ते आग्रही असून त्यासाठीच त्यांनी नव्याने पत्र पाठवले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here