नवी दिल्ली : सरकारची अटल पेन्शन योजना चांगलीच प्रसिद्ध आहे. देशातील कोणताही नागरिक जो करदाता नाही तो या योजनेचा लाभ घेऊ शकतो. गेल्या वर्षी ऑक्टोबर २०२२ मध्ये नवीन नियम लागू करण्यात आला होता, तर त्याआधी प्रत्येकजण या योजनेत गुंतवणूक करण्यास पात्र होता. या योजनेंतर्गत छोटीशी गुंतवणूक करून तुम्हाला खात्रीशीर पेन्शन मिळू शकते. दरमहा ५,००० रुपये पेन्शन मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या कमाईतून दरमहा या योजनेत फक्त २१० रुपये गुंतवावे लागतील.

अटल पेन्शन योजना
सर्वसामान्यांना गुंतवणुकीचे सर्वोत्तम पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने २०१५-१६ मध्ये अटल पेन्शन योजना सुरू केली होती. सेवानिवृत्तीनंतर मिळणारे नियमित उत्पन्न पाहता योजना सुरू करण्यात आली होती. यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही सेवानिवृत्तीनंतर तुमचे उत्पन्न निश्चित करू शकता. या योजनेच्या फायद्यांमुळे लोक योजनेकडे आकर्षित होत आहेत, याचा अंदाज APY योजनेच्या वाढत्या ग्राहकांच्या संख्येवरून लावला जाऊ शकतो.

NPS Calculator: सेवानिवृत्तीनंतर दरमहिन्याला मिळणार लाखो रुपये, घ्या जाणून आता किती पैसे गुंतवायचे
उतार वयात पैशाची टेन्शन नाही
वृद्धापकाळात पेन्शन हा सर्वात मोठा आधार म्हणून अटल पेन्शन योजनेच्या गुंतवणूकीचा मुख्य फायदा आहे. तुम्ही दरमहा थोडी रक्कम जमा करून तुम्ही वृद्धापकाळात रु. १००० ते रु. ५००० पर्यंतच्या मासिक पेन्शनचा लाभ घेऊ शकता. यामध्ये गुंतवणुकीसाठी १८ ते ४० वर्षे वयोमर्यादा आहे. अलीकडेच या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांच्या संख्येनेही पाच कोटींचा टप्पा ओलांडला असून त्याचे फायदे खालीलप्रमाणे पाहा.

PPF की करमुक्त बॉन्ड्स, निवृत्ती काळात आर्थिक कडकीपासून दूर राहण्यास कोणता पर्याय उपयुक्त, वाचा
अटल पेन्शन योजनेचे फायदे

  • जर तुम्ही वयाच्या १८ व्या वर्षी या योजनेत गुंतवणूक सुरू केली तर तुम्हाला वयाच्या ६० नंतर दरमहा २१० रुपये जमा करून दरमहा ५,००० रुपये पेन्शन मिळेल.
  • दरमहिना १००० रुपयांच्या पेन्शनसाठी तुम्हाला ४२ रुपये, २००० रुपये ८४ रुपये, ३००० रुपये १२६ रुपये आणि ४००० रुपये पेन्शनसाठी तुम्हाला १६८ रुपये दरमहा जमा करावे लागतील.
  • या योजनेत जितक्या लवकर गुंतवणूक सुरू होईल तितका फायदा होईल. यातील गुंतवणुकीचे प्रमाण तुम्ही तुमच्या स्वतःच्या हिशोबाने वाढवू किंवा कमी करू शकता.
  • अटल पेन्शन योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ही योजना गुंतवणूकदाराच्या मृत्यूनंतरही त्यांच्या कुटुंबाला लाभ देत राहील.
  • अटल पेन्शन योजनेतील गुंतवणुकीवर प्राप्तिकर कायदा ८०सी अंतर्गत १.५ लाख रुपयांपर्यंत कर लाभ मिळतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here