वाशिम : वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाटात रविवारी जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. विशेषतः रिसोड व मालेगाव तालुक्यात शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. मालेगाव तालुक्यातील मुसळवाडी येथील शेतकरी निवास गोविंदा कदम त्याचे वडील गोविंदा राजाराम कदम हे दोघे शेतामध्ये आंबे तोडण्यासाठी गेले होते. तेथेच आंब्याच्या झाडावर वीज कोसळून निवास गोविंदा कदम या ३१ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. तर वडील गोविंदा कदम वय ७० वर्ष हे गंभीर जखमी झाले आहेत.दुसऱ्या घटनेत रिसोड तालुक्यातील भर जहागीर येथील शेतकरी संदीप दत्ता काळदाते हे ३२ वर्षीय शेतकरी आपल्या शेतात उभे असताना, त्यांच्या अंगावर वीज पडली. वि‍जेचा प्रवाह इतका जास्त होता की, या विजेच्या धक्क्याने त्यांचा चेहरा जमिनीमध्ये घुसल्याची माहिती मृतकाच्या नातेवाईकांनी दिली आहे.
वीज पडल्यानंतर त्यांना रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तिसऱ्या घटनेत कोयाळी जाधव (ता.रिसोड) येथे वीज अंगावर कोसळून दोन गायी जागीच मृत्युमुखी पडल्या. यामुळे शेतकऱ्याचे ६० हजार रुपयांचे नुकसान झाले तर चौथ्या घटनेत नंधाना (ता.रिसोड) येथील पांडुरंग निवृत्ती टाले यांच्या मालकीच्या दोन जनावरांवर वीज पडल्याने दोन्ही जनावरे दगावली. यामध्ये एक म्हैस आणि एक बैल होता. पंचनामा करून सरकारने मदत द्यावी अशी मागणी शेतकरी पांडुरंग टाले यांनी केली.

विद्यार्थ्यांचं शिक्षण धोक्यात, मोडकळीस आलेली शाळा, त्यात केंद्र सरकारचा आदेश, मुलांचं भवितव्य अंधारात

दोन ठिकाणी लग्न मंडप उडून वऱ्हाडी मंडळींचा गोंधळ उडाला. जिल्ह्यात काल अनेक ठिकाणी लग्न सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र अचानक पाऊस आल्याने लग्नात मोठा गोंधळ उडाला. मानोरा तालुक्यातील रुई’ येथे लग्न सोहळ्यात शेवटचे मंगलाष्टक सुरू असतांना पावसाने अचानक हजेरी लावली आणि मंडपच उडून गेला. तर रिसोड तालुक्यातील बिबखेड येथेही वऱ्हाडी मंडळी जेवण करत असताना मंडप उडून गेला, यामुळे वऱ्हाडी मंडळींसह नवरी नवरदेवलाही पावसात भिजावे लागले. नंतर एका हॉल मध्ये वऱ्हाडी मंडळीला जेवू घातले गेले.
भरबाजारात मुळशी पॅटर्नचा थरार: २ तरुणांवर चाकूने सपासप वार; एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here