मुंबई : राजधानी मुंबईत गुन्ह्यांच्या आणि चोरीच्या घटना वाढत असताना आता आणखी एक धक्कादायक प्रकार वसईमधून समोर आला आहे. वसईमध्ये एका राष्ट्रीयकृत बँकेच्या एटीएमची तोडफोड करून चोरट्यांनी फक्त १५ मिनिटांमध्ये १९ लाख रुपये लंपास केले. रविवारी पहाटे ही घटना घडली असून यामध्ये ४ चोरट्यांचा समावेश आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती आहे.मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळच्या सुमारास ४ जण एटीएममध्ये शिरले आणि त्यांनी अशी शक्कल लढवत एटीएम उघडलं की अवघ्या १५ मिनिटांमध्ये १९ लाख रुपये लंपास झाले. वालिव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे काम फक्त अनुभवी व्यक्तीच करू शकतो. चोरट्यांनी गॅस कटरचा वापर करून पेटी उघडली असावी, ज्यामध्ये रोकड ठेवण्यात आली होती.

Whatsapp मेसेज आला, ‘खिशात ३ लाख, मागे गुंड लागलेत, मला मदत करा’ २ तासांनी सापडला मृतदेह

एटीएमधून पैसे लंपास करण्यासाठी चोरट्यांची शक्कल…

वसई (पू)इथल्या गोलाणी नाका इथं डीप टॉवर इमारतीच्या १३ क्रमांकाच्या दुकानातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएमवर पहाटे ३.१५ च्या सुमारास चोरट्यांनी डल्ला मारला. तोंडावर लोकरीच्या टोप्या घातलेल्या चौघांनी मोठ्या हुशारीने एटीएम उघडले आणि पैसे घेऊन फरार झाले.

Odisha Train Accident: २७५ जणांचा जीव घेणाऱ्या ओडिशा ट्रेन अपघातातील ३ गाड्यांच्या ड्रायव्हरचं काय झालं? वाचा Inside Story

चार चोरटे… तिघे आत तर एकाने बाहेरून दिला पहारा

एटीएममध्ये चोरी झाली असल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पण तोपर्यंत उशिर झाला होता. तिघांनी एटीएममध्ये प्रवेश केला आणि शटर खाली केलं. यावेळी त्यातला एक साथीदार हा बाहेर पाळत ठेवत उभा होता. चोरट्यांनी एटीएम किऑस्कमधील क्लोज सर्किट टेलिव्हिजन (सीसीटीव्ही) कॅमेऱ्याशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. फुटेजमध्ये एक आरोपी, काळा शर्ट आणि पायघोळ घातलेला, लोकरीची टोपी आणि शाल घातलेला कॅमेरा बंद करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

यानंतर कॅशचा बॉक्स उघडण्यासाठी गॅस कटरचा वापर करण्यात आला. हातमोजे, चाकू आणि स्क्रू ड्रायव्हरही चोरट्यांनी चोरी करण्यासाठी आणलं होतं. बँकेच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना सांगितले की, वीकेंडच्या आधी मशीनमध्ये १९ लाख रुपयांचा साठा होता. सर्व माहिती गोळा करून अखेर चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती आहे.

Weather Alert: राज्यासाठी २४ तास धोक्याचे, ठाण्यासह १९ जिल्ह्यांना IMD कडून पावसाचा अलर्ट जारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here