बँक खात्यात किंवा FD मध्ये १० लाखांपेक्षा जास्त रोख नाही
तुम्ही एका आर्थिक वर्षात तुमच्या कोणत्याही बँक खात्यात १० लाख रुपये किंवा त्याहून अधिक रोख रक्कम जमा केल्यास आयकर विभाग तुमची चौकशी करू शकतो. लक्षात घ्या की चालू खात्यात कमाल मर्यादा ५० लाख रुपये सौं FD मध्ये देखील तुम्ही एका वर्षात १० लाख रुपयांपेक्षा जास्त रोख जमा करू शकत नाही. जर तुम्हाला यापेक्षा जास्त रक्कम जमा करायची असेल तर तुम्ही ऑनलाइन किंवा चेकद्वारे पैसे भरू शकता.
क्रेडिट कार्ड बिल पेमेंट किंवा गुंतवणुकीसाठी रोखेचा वापर
तुम्ही एक लक्ष रुपयांपेक्षा जास्त रक्कमेचे बिल भरण्यासाठी रोख वापरत असल्यास तुम्हाला त्याची स्रोताची माहिती विचारली जाऊ शकते. तसेच तुम्ही गुंतवणुकीसाठी जास्त रोख वापरू शकत नाही. जर तुम्ही कोणत्याही शेअर्स, म्युच्युअल फंड किंवा बाँड्समध्ये रोख व्यवहार करत असाल तर यासाठी देखील तुम्ही एका आर्थिक वर्षात १० लाखांपेक्षा जास्त रोख वापरू शकत नाही. तुम्ही असे केल्यास आयकर विभाग तुम्हाला नोटीस पाठवू शकतो.
मालमत्तेसाठी रोख रक्कम भरण्याचे नियम
रिअल इस्टेट क्षेत्रात रोख रकमेचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मालमत्ता खरेदी करण्यासाठी तुम्ही रोख रक्कम भरल्यास त्याच्या नियमांची माहिती असणे महत्त्वाचे आहे. अशा स्थितीत प्रॉपर्टी रजिस्ट्रारसोबत रोखीने मोठा व्यवहार केल्यानंतर त्याचा अहवाल प्राप्तिकर विभागाकडे जातो. जर तुम्ही ३० लाख किंवा त्याहून अधिक किमतीची मालमत्ता रोखीने खरेदी किंवा विकली तर आयकर विभागाला त्याची माहिती मिळते. त्यामुळे रोखीने व्यवहार करण्याचे हे नियम नेहमी लक्षात ठेवा, नाहीतर तुम्ही अडचणीत येऊ शकता.