ठाण्यात मेट्रो कामावेळी मोठा हलगर्जीपणा समोर आला आहे. मेट्रोचं काम सुरू असताना १५ ते २० फूट उंचीवरुन लोखंडी सळई कोसळली. ही सळई कारच्या छतातून आरपार घुसली.

 

thane metro work
ठाणे: ठाण्यातील तीन हात नाका इथे एक विचित्र घटना घडली आहे. मेट्रोचं काम सुरू असताना वरुन अचानक एक सळई कोसळल्याची घटना घडली. वरुन पडलेली सळई कारच्या छतातून आरपार घुसली. सुदैवानं कारच्या चालकाला कोणतीही इजा झाली नाही. दैव बलवत्तर म्हणून तो थोडक्यात बचावला.ठाण्यात मेट्रो चार या मार्गिकेचं काम सुरू आहे. यावेळी १५ ते २० फूट उंचावरुन लोखंडाची सळई खाली पडली आणि ती खालून जात असलेल्या कारमध्ये आरपार घुसली. वाहन चालकापासून अवघ्या काही इंच अंतरावर सळई पडल्यानं त्याचा जीव वाचला. या दुर्घटनेमुळे मेट्रो कामाच्या वेळी सुरू असलेला हलगर्जीपणा समोर आला आहे. मेट्रोचं काम सुरू असताना सुरक्षेचं निकष कितपत पाळले जातात, असा प्रश्न या घटनेमुळे निर्माण झाला आहे.
मूड ऑफ! प्रशांतला सोडू नका!! घरात सापडली तरुणीची बॉडी; कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकली
एमएमआरडीएकडून वडाळा-घाटकोपर-कासारवडवली मेट्रो चार मार्गिकेच्या निर्मितीचं काम सुरू आहे. या अंतर्गत लालबहादूर शास्त्री मार्गावरही विविध कामं सुरू आहेत. सोमवारी सकाळी या मार्गावरुन जितेंद्र यादव इक्को कारमधून भांडूपहून तीन प्रवाशांना घेऊन कोलशेतच्या दिशेनं निघाले होते. त्यांची कार भारत पेट्रोल पंपाजवळ आली असताना वरुन एक सळई कोसळली. लोखंडी सळई कारच्या छतामधून आरपास घुसली. यादव यांच्या डोक्यापासून काही इंच अंतरावर सळई पडल्यानं त्यांचा जीव थोडक्यात वाचला.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here