मुलगी घरातून पळून गेल्यानंतर कुटुंबियांनी पोलिसांत धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी मुलीचा शोध घेतला. कुटुंबियांच्या उपस्थितिमध्ये मुलीशी बोलणं झाल्यानंतर पळून गेलेल्या मुलीने आपल्या प्रेमासाठी चक्क आई-वडिलांनाच ओळखण्यास नकार दिला. यानंतर ती आपल्या प्रियकरासोबत निघून गेली. यानंतर खचून गेलेल्या पालकांनीही असं काही केलं की सगळीकडे सध्या या घटनेची चर्चा सुरू आहे.
कालच्या प्रेमापुढे जन्मदात्याला विसरली…
मुलीच्या अशा निर्णयामुळे कुटुंबिय इतके दुखावले गेले की त्यांनी आपली मुगली आपल्यासाठी मेली असाच निर्णय घेतला. इतकंच नाहीतर त्यांनी तिच्या नावाने शोक संदेशही छापला आहे. यामध्ये मुलीच्या मृत्यूनंतर १३ व्याचे जेवण आहे, सगळ्यांनी यावं असा मेसेज छापण्यात आला होता. वडिलांनी ओळखीच्या सगळ्यांना आणि नातेवाईकांना हे कार्ड दिलं आहे.
मुलगी पळून गेल्यानंतर कुटुंबियांनी घेतलेल्या या निर्णयाची आणि शोक संदेश देणाऱ्या कार्डाची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू आहे. या कार्डाचा फोटोही व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मुलीचा फोटोही लावण्यात आला आहे. जिवंत मुलगी मृत असल्याचं सांगत वडिलांनीच तिचा १३ वा घालत लोकांना जेवणासाठी बोलावलं.
मुलगी प्रियकरासह पळून गेली…
खरंतर, प्रिया जाट असं तरुणीचं नाव असून ती रतनपुरा गावातील राहणारी आहे. तिने कुटुंबियांच्या इच्छेविरुद्ध तिच्या पसंतीच्या तरुणासह पळून गेली. यावरून नातेवाईकांनी पोलीस ठाणे गाठत बेपत्ता झालेल्या प्रियाची तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्रियाला शोधून तिच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत तिच्याशी बोलणं करून दिलं. यावेळी तिने आपल्या कुटुंबातील सदस्यांना ओळखण्यास स्पष्ट नकार दिला आणि प्रियकरासोबत निघून गेली.
यानंतर दुखी झालेल्या कुटुंबियांनी थेट, आमची मुलगी मरण पावली आहे असं ठरवलं आणि शोक संदेश छापून लोकांना जेवणासाठी घरी बोलावलं. शोक संदेशात प्रियाचा मृत्यू १ जून २०२३ रोजी होईल असं लिहिलं होतं आणि १३ व्याचं जेवण १३ जून ठेवण्यात आलं आहे.
शोक संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाला…
हा शोक संदेश सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. इंस्टाग्राम, फेसबूकपासून ट्विटरपर्यंत या शोक संदेशाचे फोटो वेगाने व्हायरल होत आहे आणि नेटिझन्स विविध प्रकारे यावर कमेंट करत आहेत. काहीजण कुटुंबाचा हा निर्णय योग्य तर काही चुकीचा असल्याची प्रतिक्रियाही देत आहेत.