अमरावती: एक विकृत व्यक्ती चक्क अंडर गारमेंटवर एका महिलेच्या घरात शिरला. हा प्रकार महिलेच्या पतीच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्याला हटकले. त्यावर विकृत मारण्यासाठी त्यांच्या अंगावर धावला. ही धक्कादायक घटना परतवाडा ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उमेश रघुनाथ जवंजाळ (वय ४४,रा. अंजनगाव सुर्जी, ह.मु. परतवाडा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या विकृताचे नाव आहे. सायंकाळीच्या सुमारास संबंधित महिला ही घरी एकटी होती. त्यावेळी खालच्या मजल्यावर भाड्याने राहणारा उमेश हा अंतर्वस्त्रावर महिलेच्या खोलीकडे जात होता. त्याचवेळी महिलेचे पती घरी आले. त्यांना उमेश हा चड्डी बनियावर आपल्या घराकडे जात असल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी उमेशला हटकले. मी घरी नसताना तू माझ्या घराकडे असा का जात आहे, असा जाब विचारून त्यांनी त्याला हाकलून लावले.

अल्पवयीन महिला कुस्तीपटूकडून बृजभूषण सिंगांवरील आरोप मागे; कुस्तीपटूंच्या आंदोलनाला सेटबॅक
या प्रकारानंतर महिलेचे पती हातपाय धुण्यासाठी बाथरूममध्ये गेले. त्यावेळी उमेश हा त्याच अवस्थेत पीडित महिलेच्या खोलीत शिरला. उमेशला त्या अवस्थेत पाहून महिला जोरात ओरडली. सदर घटनेनंतर पीडित महिलेने लागलीच परतवाडा ठाणे गाठून तक्रार दाखल केली. माझ्या एकांतपणाचा गैरफायदा घेऊन उमेश हा अंतर्वस्त्र वाईट उद्देशाने आपल्या खोलीत शिरला, अशी तक्रार महिलेने दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी उमेशविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

द्विशतक करणाऱ्या फलंदाजाला संघाबाहेर ठेवा, ५ पैकी ३ गोलंदाज हे…; गावस्करांचा मोलाचा सल्ला

मुसंडी पाहून महाराष्ट्राची संस्कृती कळेल; घनश्याम दरोडेंचं गौतमी पाटीलला ओपन चॅलेंज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here