राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे तारुण्यातील फोटो आणि व्हिडिओ यानिमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळाले. शिवसेनेत दोघं एकत्र काम करतानाचे क्षण हे ठाकरे बंधू एकत्र येण्याकडे आस लावून बसलेल्यांसाठी आशादायी होते. फोटोंचा कोलाज सुरु असतानाच ‘तेरा यार हू मै’ हे गाणं कोणाच्याही अंगावर काटा आणणारं होतं.
व्हिडिओ क्लीप संपल्यावर राज ठाकरे काय म्हणाले?
राज ठाकरे : खूप छान दिवस होते ते… माहित नाही मला, कुणीतरी विष कालवलं किंवा नजर लागली. असो…
अवधूत गुप्ते : ते दिवस परत येऊ शकत नाही?
राज ठाकरे : माहिती नाही. विषय हा फक्त राजकीय नव्हता ना… आमच्या मनात काय, यापेक्षा आमच्या आजूबाजूच्या लोकांच्या मनात काय आहे… हे राजकारण खूप घाणेरडं असतं. दुर्दैव! अजून काय?
अवधूत गुप्ते : तुमच्यात पण ना एक वाघ आहे. एवढं सगळं झालेलं असताना उद्धव ठाकरेंना बरं नव्हतं, तेव्हा तुम्ही सरळ गाडी काढली, मीडियाचा विचार न करता स्टेअरिंगवर बसलात..
राज ठाकरे : मीडियाचा काय विचार करायचा? मी कुणाचाही विचार करत नाही. मला ज्या वेळेला एखादी गोष्ट वाटते, त्या वेळेला मी ती करतो. ती गोष्ट करत असताना मला कोणी थांबवू शकत नाही.
अवधूत गुप्ते : असंच गाडी काढून जा आणि हक्काने सांगा ना, चल उद्धव, बास झालं आता…
राज ठाकरे : तुम्हाला काय वाटतं, हे झालं नसेल? जाऊ दे!
अवधूत गुप्ते : जाऊ दे म्हणजे? आम्ही हिंतचिंतक आहोत
राज ठाकरे : हो, माहीत आहे
अवधूत गुप्ते : आम्ही तुम्हा दोघांचेच नाही, महाराष्ट्राचे हितचिंतक आहोत.
राज ठाकरे : मला कल्पना आहे. बघू, नियतीच्या मनात उद्या काही असेल समजा…
पाहा व्हिडिओ :