TOI च्या रिपोर्टनुसार, विश्वजितला वडिलांनी काही तासांपूर्वीच शालीमार स्टेशनवरून कोरोमंडल एक्सप्रेसमध्ये बसवलं होतं. पण, तेव्हा आपला मुलगा एवढ्या मोठ्या अपघाताला बळी पडेल आणि त्याला जीवाची बाजी लावावी लागेल याची त्यांना कल्पनाही नव्हती. काही तासांनंतर रेल्वेचा अपघात झाल्याची बातमी त्यांनी कळाली. म्हणून त्यांनी मुलाला फोन केला. यानंतर मुलानेही फोन उचलला. पण जखमी असल्यामुळे तो फार काही सांगू शकला नाही.
विश्वासजीतला गंभीर दुखापत झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. यानंतर वडिलांनी ताबडतोब स्थानिक रुग्णवाहिका चालकाला बोलावले बालासोरला रवाना झाले. २३० किलोमीटरचा प्रवास करून ते बालासोरला पोहोचले. पण त्यांना कुठेही मुलाचा शोध लागला नाही.
कुठेही न सापडल्याने शेवटी शवागारात पोहोचले अन्…
घटनास्थळी पोहोचल्यानंतर सर्वांनी मिळून विश्वजीतचा शोध सुरू केला. पण तो कुठेच सापडला नाही. पण शेवटच्या क्षणापर्यंत आपला मुलगा जिवंत असल्याचं त्याच्या वडिलांनी ठरवलं होतं. घटनास्थळी मुलाची विचारपूस केल्यानंतर वडील हिलाराम हे शवागारात पोहोचले, जिथे मृत्यू झालेल्या सगळ्यांचे शव ठेवण्यात आले होते.
उजवा हात थरथरत होता….
खरंतर, सुरुवातील त्यांना आतमध्ये जाण्याची परवानगी मिळाली नाही. पण नंतर शवागारात असलेल्या कोणाची तरी नजर अशा हातावर पडली जो थरथरत होता. शवागारात थरथरता हात पाहून व्यक्ती घाबरला. त्यानंतर त्याने ही माहिती सगळ्यांना सांगितली असता तो विश्वजीत असल्याचं समोर आलं. यानंतर वडिलांनी त्याला तातडीने रुग्णालयात हलवलं आणि सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहे.