ठाणे : सध्या देशभरात ऑनलाईन धर्मांतराचा विषय मोठ्या प्रमाणात गाजत आहे. या धर्मांतराच्या विषयाचे कनेक्शन आता मुंब्र्यात असल्याची बाब उघड झाली आहे. मुंब्र्यातील आरोपी शाहनवाज खान याने फेक युजर आयडी बनवून त्याच्या मदतीने एक गेम लॉन्च केला आणि या गेममध्ये हरणाऱ्या हिंदू मुलांना कलमा वाहण्यासाठी तयार करून इस्लाम कबुल करण्यास भाग पडल्याचे समोर आले आहे. हा आरोपी मुलांना इस्लाम कबुल केला तर तुम्ही कधी गेम हरणार नाही असे अमिश दाखवत होता. या आरोपीच्या शोधात उत्तर प्रदेश येथील गाजियाबाद पोलिसांनी या शाहनवाजचा शोध घेत मुंब्रा येथे पोहचले आहेत. मात्र आरोपी शाहनवाज हा आपल्या कुटुंबियांसोबत फरार असल्याने गाजियाबाद पोलिसांच्या पथकाची स्थानिक मुंब्रा पोलिसांसोबत शोध मोहीम सुरु आहे.

हिंदू धर्मीय मुलांना ऑनलाइन गेमद्वारे धर्मांतर होत असल्याची नोटीस उत्तर प्रदेशातील गाझियाबाद पोलिसांनी बजावली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी शाहनवाज खान हा आपल्या कुटुंबीयांसोबत मुंब्रा येथील देवरी पाडा परिसरात रहाणार असल्याची माहिती गाजियाबाद पोलिसांना मिळाली. या मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेश एसटीएफचे पथक आरोपीच्या शोधासाठी मुंब्र्यात दाखल झाले.

बिहारमध्ये मोठी दुर्घटना, भागलपूरमध्ये निर्माणाधीन पूल कोसळला, गंगा नदीवर बांधला जात होता पूल… पाहा व्हिडिओ
या प्रकरणाच्या तपासात उत्तरप्रदेश पोलिसांनी गाजियाबाद येथून अब्दुल रहमान उर्फ नन्नी पुत्र महमूद अन्सारी या आरोपीला अटक केली. कुटुंबीयांची तक्रार गाझियाबाद येथून अटक करण्यात आलेल्या आरोपीने पोलिसांच्या चौकशीत सांगितले की, महाराष्ट्रातील मुंबईला लागून असलेल्या मुंब्रा भागात शाहनवाज मकसूद खान हा बनावट युजर आयडी बनवून त्याच्या माध्यमातून तो तो गेम खेळण्यासाठी उपलब्ध करून देत होता. या गेम मध्ये हरलेल्या हिंदू मुलांना तो कलमा वाचायला सांगून इस्लाम कबूल करण्यास भाग पडत होता. त्यांना कलमा वाचल्यानंतर तुम्ही कधीही गेम हरणार नसल्याचे अमिश दाखवत होता.

हॅलो… तू अविवाहित आहेस का?, महिला पोलिसांना तो करतो अश्लील व्हिडिओ कॉल, पोलीस दलात खळबळ
मुंब्रा येथील देवरी पाडा येथे असलेल्या शाझिया इमारतीच्या पहिल्या मजल्यावर शाहनवाज मकसूद खान नावाचा व्यक्ती आपल्या कुटुंबासह राहत होता. गाझियाबाद पोलीस शाहनवाज मकसूद खानच्या शोध घेत असून त्याला अटक करण्यासाठी काही दिवसांपासून मुंब्रा येथील देवरी पाडा येथे आले. मात्र शाहनवाज मकसूद खान हा आपल्या कुटुंबासह कुठेतरी फरार झाला आहे.

शाहनवाजच्या शेजारच्यांनी सांगितले की, त्याच्या घरात तीन भाऊ आणि आई असा परिवार आहे. शाहनवाजचा हर्बल शॅम्पू बनवण्याचा व्यवसाय आहे. गेल्या आठवड्यापासून त्यांच्या घराला कुलूप आहे. मात्र अद्याप कुठलेही पोलीस आले नसल्याचे शेजाऱ्यांकडून सांगण्यात आले.

Ruturaj Gaikwad Wedding: क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाडने बांधली लगीनगाठ, स्टार ओपनरने फोटो शेअर करत दिली माहिती
या बाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी गाजियाबाद येथून आलेले पथक हे आपल्या सोबत सर्च ऑपरेशन सुरू असल्याचे सांगितले. गेल्या चार दिवसांपासून शाहनवाजचा शोध सुरु आहे. मात्र या प्रकरणी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास पोलिसांनी नकार दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here