जौनपूर: उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील जलालपूर येथे लग्नाच्या दिवशी मुलगी पळून गेल्याची घटना घडली आहे. जलालपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या एका गावात शनिवारी मिर्झापूर येथून वरात येणार होती. दुपारी मंत्री पूजेच्या कार्यक्रमात वधू घरातून पळून गेली. मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात नवरी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. नंतर गावातीलच प्राथमिक शाळेत मुलगी सापडली.

खरे म्हणजे या मुलीला इतक्यात लग्नच करायचे नव्हते. प्रथम तिला आयएएसची तयारी करून तिला परीक्षा द्यायची होती आणि म्हणूनच ती घरातून पळून गेल्याचे या मुलीने सांगितले.

ऑनलाईन धर्मांतर प्रकरणाचे मुंब्रा कनेक्शन; मोबाइल गेम झाला धर्मांतराचा सोपा मार्ग, आरोपी फरार
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जलालपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावात शनिवारी मिर्झापूर येथून मुलीची लग्नाची वरात येणार होती. मात्र, दुपारी मंत्रीपूजेच्या कार्यक्रमादरम्यान मुलगी फरार झाली. काही वेळाने मुलीचा शोध सुरू झाला, मात्र मुलगी कुठेच सापडली नाही. त्रस्त वडिलांनी जलालपूर पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पण नवऱ्यामुलाने लग्न रद्द न करता त्याच्या कुटुंबीयांनी मुलाच्या संमतीने दुसऱ्या मुलीशी त्याचे लग्न लावून दिले.

बिहारमध्ये मोठी दुर्घटना, भागलपूरमध्ये निर्माणाधीन पूल कोसळला, गंगा नदीवर बांधला जात होता पूल… पाहा व्हिडिओ
मुलीला आयएएस व्हायचे आहे

नवरी मुलीला गावातीलच प्राथमिक शाळेतून मुलीला बाहेर काढण्यात आल्यानंतर तिने सांगितले की, ती कोणाच्या सांगण्यावरून पळून गेली नाही किंवा तिला कोणी पळवूनही नेले नाही, तर तिला यूपीएससीची तयारी करायची आहे. आणि तिच्यावर जबरदस्तीने लग्न केले जात असल्याने तिने पळून जाण्याचा निर्णय घेतला. दरम्यान पोलिसांनी मुलीला ताब्यात घेतले असून या प्रकरणातील इतर पैलूंचा तपास सुरू आहे.

हॅलो… तू अविवाहित आहेस का?, महिला पोलिसांना तो करतो अश्लील व्हिडिओ कॉल, पोलीस दलात खळबळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here