मुंबई : टाटा समूहातील ऑटो कंपनी, टाटा मोटर्सचे शेअर्स यावर्षी भारतीय शेअर बाजारात तेजीने वाटचाल करत आहेत. कंपनीच्या शेअरची किंमत सुमारे २% वाढून ५४४.८० रुपयांवर पोहोचली आहे. गुजरात सरकारसोबतचा करार हा कंपनीच्या शेअर्सच्या किमती वाढण्याचे प्रमुख कारण मानले जात आहे. टाटा मोटर्सने शुक्रवारी गुजरातच्या विजय रुपाणी सरकारसोबत लिथियम-आयन सेल कारखाना उभारण्यासाठी करार केला असून या गुंतवणुकीचे मूल्य १३,००० कोटी रुपये असेल. लक्षात घ्या की भारत स्वतःची इलेक्ट्रिक वाहन पुरवठा साखळी तयार करण्याचा प्रयत्न करत आहे.

टाटा मोटर्सचा गुजरातमधील सनंत येथे कार्यरत प्लांट आहे. याशिवाय कंपनीने फोर्ड मोटर्सचा प्लांटही विकत घेतला आहे. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, दोन्ही कंपन्यांच्या एकत्रीकरणाला एक वर्षाचा कालावधी लागू शकतो. या सर्व नवीन अपडेटने टाटा मोटर्सच्या शेअर्सला पंख दिले आहेत. कंपनीच्या समभागांनी सध्या फेब्रुवारी २०७ ची सर्वोच्च पातळी ओलांडली आहे.

Tata Tech IPO: टाटाच करणार कमाल! आयपीओमुळे मोठा फायदा होणार, गुंतवणूकदारांचा उदंड प्रतिसाद
टाटा मोटर्सच्या शेअर्सचा इतिहास
यावर्षी आतापर्यंत टाटा मोटर्सच्या शेअर्सच्या किमती ४०% हून अधिक वाढल्या असून या कालावधीत बीएसई सेन्सेक्सने केवळ २.५% उसळी घेतली आहे. गुंतवणूकदारांसाठी चांगली गोष्ट म्हणजे गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअरच्या किमतीत १४ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

टाटा मोटर्सवर ब्रोकरेजचे मत
अलीकडेच, मूडीजइन्व्हेस्टर्स सर्व्हिसने टाटा मोटर्सवरील रेटिंगचा दृष्टीकोन स्थिरते सकारात्मक असा सुधारित केला.मूडीजचे वरिष्ठ उपाध्यक्ष कौस्तुभ चौबल यांनी एका निवेदनात म्हटले की, टाटा मोटर्सच्या क्रेडिट प्रोफाइलमध्ये गेल्या काही तिमाहीत झालेली सुधारणा पुढील १२-१८ महिन्यांत कायम राहण्याची अपेक्षा आहे.

गुंतवणूक करताय… हे लक्षात घ्या!

त्यांनी पुढे म्हटले की व्हॉल्यूम आणि नफा यातील सतत वाढ कंपनीच्या कमाईला आणि मुक्त रोख प्रवाहाच्या विस्तारास समर्थन देईल, ज्यामुळे भांडवली खर्च जास्त असला तरीही कर्ज कमी होईल. ब्रोकरेज फर्मचे विश्लेषक प्रभुदास लिलाधर यांनीही टाटा मोटर्सबद्दल सकारात्मक भूमिका घेतली असू ब्रोकरेज फर्मने स्टॉकसाठी ६०५ रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे.
Tata Group Stocks: गुंतवणूकदारांना लॉटरी! हातात येणार कोऱ्या करकरीत नोटा, तुमच्याकडे आहे का हे स्टॉक्स…
टाटा मोटर्स स्टॉकची कामगिरी कशी आहे?
टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये अलिकडच्या काळात शानदार तेजीने व्यवहार होत आहे. गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये जवळपास १५% वाढ झाली असून मागील ६ महिन्यांत शेअर्सनी २८% उसळी घटली आहे. तसेच या वर्षात आतापर्यंत कंपनीचे शेअर्स जवळपास ३९ तर आणि गेल्या एका वर्षात शेअर्सनी २७ टक्के परतावा दिला आहे.

(नोट: इथे फक्त शेअरच्या कामगिरीबद्दल माहिती दिली आहे. याला गुंतवणुकीचा सल्ला मानू नये. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here