थिरुवनंतपुरम : केरळमधील एका महिलेवर आपल्या मुलांकरवी आपल्या अर्धनग्न शरीरावर पेंटिंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे प्रकरण शेवटी न्यायालयात गेले. यावेळी केरळ उच्च न्यायालयाने नग्नता आणि अश्लीलतेत फरक असल्याचे सांगत आपला निर्णय दिला. महिलेच्या नग्न शरीराकडे अश्लीलतेच्या नजरेने पाहणे उचित नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

उच्च न्यायालयाने सांगितले की, नेहमीच लोकांना त्यांच्या शरीराच्या स्वायत्ततेच्या हक्कांपासून वंचित केले जाते. हे चुकीचे आहे, असे सांगत उच्च न्यायालयाने या महिलेवर करण्यात आलेल्या अश्लीलतेच्या आरोपाचे प्रकरण निकालात काढले.

लग्नाच्या दिवशीच पळून गेली नवरी, शाळेत जाऊन लपली, सकाळी कारण सांगितल्यावर लोक थक्क झाले
या प्रकरणी महिलेचे असे म्हणणे आहे की, तिने महिलांच्या शरीराच्या संबंधात पितृसत्ताक धारणेला आव्हान दिले आहे. तसेच आपल्या मुलांना सेक्स एज्युकेशन देण्यासाठी तिने व्हिडिओ बनवल्याचेही तिने न्यायालयाला सांगितले. हा व्हिडिओ अश्लील आहे असे म्हणता येत नाही असे उच्च न्यायालाने म्हटले आहे.

महिलेचा आपल्या शरीरावर हक्क आहे

या प्रकरणी न्यायालयाने म्हटले की, महिलांच्या शरीराच्या वरील भागाला नग्नता किंवा लैंगिक किंवा अश्लील म्हटले जाऊ शकत नाही. महिलेचे नग्न शरीर हे कोणत्याही दृष्टीने अश्लील नाही. या महिलेने आपल्या मुलाला केवळ आपल्या शरीरीवर एखाद्या कॅनव्हाससारखे पेंटिंग करण्याची परवानगी दिली होती. आपल्या शरीराबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेणे हा एक महिलेचा हक्क आहे, असेही न्यायालयाने पुढे म्हटले आहे.

ऑनलाईन धर्मांतर प्रकरणाचे मुंब्रा कनेक्शन; मोबाइल गेम झाला धर्मांतराचा सोपा मार्ग, आरोपी फरार
पुरुषांच्या नग्न शरीरावर क्विचितच प्रश्न उपस्थित केले जातात, असे न्यायमूर्ती कौसर एडप्पागथ यांनी म्हटले आहे. महिलांवर सतत प्रश्न उपस्थित करणे पितृसत्ताक पद्धतीची निशाणी आहे. महिलांचा त्यांच्या बोल्ड चॉइसबाबत नेहमीच छळ केला जातो, असेही न्यायमूर्तींनी म्हटले आहे.

न्यायालयाचा हा निर्णय समाजात पुरुष आणि महिलांसंदर्भात भेदभावाच्या मोजमापावर आधारित आहे. एखाद्या महिलेने आपले शरीर एखाद्या कॅनव्हासारखे पेंट करण्यासाठी आपल्या मुलाला दिले तर त्यात काही वावगे नाही. या महिलेने आपल्या मुलाला आपल्या शरीराच्या वरच्या भागातील शरीरावर पेंटिंग करण्याची अनुमती दिली होती. हे कृत्य कोणत्याही प्रकारे लैंगिक कृत्य किंवा अश्लील आहे असे म्हणता येत नाही. या मुलाचा उपयोग पोर्नोग्राफीसाठी करण्यात आला असेही म्हणता येत नाही आणि या व्हिडिओत अश्लीलता अजिबातच नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.

हॅलो… तू अविवाहित आहेस का?, महिला पोलिसांना तो करतो अश्लील व्हिडिओ कॉल, पोलीस दलात खळबळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here