सुशांतसिंह प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे देण्याची मागणी होत असताना अनिल देशमुख ठामपणे मुंबई पोलिसांच्या पाठीशी उभे राहिले होते. वेळोवेळी त्यांनी मुंबई पोलिसांची पाठराखण केली होती. मुंबई पोलीस या प्रकरणाचा व्यावसायिक पद्धतीनं तपास करत आहेत. सर्व बाजू तपासून पाहिल्या जात आहेत. त्यामुळं तपासाची गरज नाही, असं देशमुख यांनी स्पष्ट केलं होतं. याबाबतीत कुणीही राजकारण करू नये, असं त्यांनी विरोधकांना सुनावलं होतं. आता सर्वोच्च न्यायालयानं हे प्रकरण सीबीआयकडे () सोपवण्याचे निर्देश दिल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी अनिल देशमुख यांना घेरलं आहे. देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधक करत आहेत.
वाचा:
या पार्श्वभूमीवर पत्रकरांनी देशमुख यांना गाठले असता त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर कुठलीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. ‘सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आलेला आहे. मात्र, त्या निकालाची प्रत अद्याप आमच्या हातात आलेली नाही. ती मिळाल्यानंतर आम्ही तिचा अभ्यास करू. त्यानंतरच मी प्रतिक्रिया देईन,’ एवढंच देशमुख यांनी सांगितलं.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times