जमिनीच्या वादातून आम्हाला न्याय न मिळाल्याची त्याची तक्रार होती. यातून त्याने हे कृत्य केल्याची माहिती मिळत आहे. मात्र, याबाबत अधिकृत दुजोरा मिळाला नाही. घटनेनंतर प्रांताधिकारी गणेश नावडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी घटनास्थळी धाव घेतली.
त्यानंतर जखमी माने यांना एमआयडीसीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ते या घटनेत १५ टक्के भाजले आहेत. रेडा येथील माने यांनी रस्त्याच्या कामासाठी इंदापूर पोलिसांनी लक्ष न दिल्याचा आरोप केला आहे. याबाबत प्रांताधिकाऱ्यांनी आदेश देऊन देखील दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप माने कुटुंबियांनी केला आहे.
दरम्यान, शेतकरी माने यांनी पेटवून घेताच त्यांच्या आईने रस्त्यावर लोटांगण घेत आक्रोश केला. “आमच्यावर मोठा अन्याय झाला आहे”. मोजणी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी शेतकरी माने यांच्या आईने केली आहे. न्याय न मिळाल्यास प्रसंगी मंत्रालयासमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील माने कुटुंबियांनी दिला आहे.
याआधीही अनेक अशा आत्मदहनाच्या घटना समोर आल्या आहेत. यात अनेक घटना मंत्रालयात घडल्या आहेत. यानंतर प्रशासनाने यासाठी कठोर पाऊलं उचलली आहेत. राज्यातील शेतकरी त्यांचे प्रश्न घेऊन शासनाकडे जातात. मात्र, तेथे त्यांच्या प्रश्नावर अपेक्षित तोडगा निघत नाही. त्यामुळे अनेक शेतकरी टोकाचा निर्णय घेतात. यातून असे काहीसं घडलेलं पाहायला मिळतं.