सातिवली-धावलीपाडा येथील रहिवासी असलेले बारकू डवला आपली पत्नी आणि चिमुकला मुलगा त्याचप्रमाणे आणखी दोन मुली असे संपुर्ण कुटुंब धुंदलवाडी येथे जात होते. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून धुंदलवाडी येथे जात असताना विवळवेढे उड्डाणपूलावर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने भीषण असा अपघात घडला आहे.
या अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवर स्वार असलेले पाचही जण दुचाकीवरून खाली पडले आणि त्यांना गंभीर दुखापत झाली. या अपघातात आई केरू बारकू डवला (वय ४०) आणि चिमुकला जैविक बारकू डवला (वय ३) या दोघांचा मृत्यू झाला आहे. दुचाकीवस्वार तीन जण गंभीर रित्या जखमी झाले आहेत. बारकू डवला (वय ४५), सुवर्णा डवला (वय १३) आणि प्राची डवला (वय १०) अशी अपघातातील जखमींची नावे आहेत.
घटनेची माहिती मिळताच कासा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि जखमींना रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, दुचाकीला धडक देणाऱ्या अज्ञात वाहनाचा शोध पोलीस घेत आहेत.
चंद्रपुरात भीषण अपघात, सहा जणांचा मृत्यू
नागपूरहून चंद्रपूरच्या दिशेने जात असताना एका अल्टो कारला खासगी बसने जोरदार धडक दिली आणि भीषण अपघात घडला. या अपघातात एखून सहा जणांचा मृत्यू झाला. ज्यामध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे. नागपूर-नागभीड रस्त्यावरील कान्पा गावाजवळ हा भीषण अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की त्यात अल्टो कारचा चक्काचूर झाला. त्यात अडकलेल्या मृतांना गाडी कापून बाहेर काढावे लागले. आपल्या बायको आणि मुलाला भेटायला जात असताना हा भयंकर अपघात घडला.