छत्रपती संभाजीनगर: गेल्या दहा वर्षापासून वाघोळा ते नांदेड या दोन गावातील रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली होती . शेतकऱ्यांच्या मागणीनंतर अखेर दहा वर्षानंतर पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत हा रस्ता तयार करण्यात आला. मात्र हा रस्ता निकृष्ट दर्जाचा बनवण्यात आल्याचे उघडकीस आली आहे. या ठिकाणच्या ग्रामस्थांनी रस्त्याची अक्षरशा चटईप्रमाणे घडी घालून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला आहे. या धक्कादायक प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.छत्रपती संभाजीनगर शहरातील फुलंब्री तालुक्यामध्ये वाघोळा ते नांद्रा हे गाव आहे. या गावांमध्ये अनेक वर्षांपासून शेतकरी राहतात. गेल्या दहा वर्षांपासून वाघोळा ते नांद्रा या गावातील रस्त्याची अक्षरशः चाळणी झालेली होती. याचा सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांना मोठ्या त्रास सहन करावा लागायचा. यामुळे गावातील रस्ता व्हावा यासाठी नागरिकांनी वेळोवेळी मागणी केली.

महिलेने मुलांकडून करून घेतली आपल्या अर्धनग्न शरीरावर पेंटिंग, बनवला व्हिडिओ आणि…
शेतकऱ्यांच्या मागणीनंतर वाघोळा ते नांद्रा या रस्त्याचे काम पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून पूर्ण करण्यात आलं. दहा वर्षानंतर नागरिकांना रस्ता उपलब्ध झाल्यामुळे आता चिंता मिटली अशी भावना सर्व नागरिकांची होती. मात्र या रस्त्याच्या कामात मोठ्या भ्रष्टाचार झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून हा रस्ता तयार करण्यात आला.

लग्नाच्या दिवशीच पळून गेली नवरी, शाळेत जाऊन लपली, सकाळी कारण सांगितल्यावर लोक थक्क झाले
दहा वर्षानंतर झालेल्या या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे गावातील तरुण पुंजाराम गायकवाड, जीवन श्रवण गायकवाड, पंढरीनाथ गायकवाड, मनोज गायकवाड यांच्या लक्षात आलं. दरम्यान तरुणांनी रस्त्यावर जात रस्त्याच्या कामाची पाहणी केली. यावेळी हाताने हा रस्ता अक्षरश: उखडून निघाला, तर काही ठिकाणी घरातील चटईप्रमाणे रस्त्याची घडीच घातली गेली.

ऑनलाईन धर्मांतर प्रकरणाचे मुंब्रा कनेक्शन; मोबाइल गेम झाला धर्मांतराचा सोपा मार्ग, आरोपी फरार
दहा वर्षानंतर पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या अंतर्गत गावातील रस्त्याचे काम केलं गेलं. मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे गावातील नागरिक संतप्त झाले आहेत. यामुळे निकृष्ट काम करून कामांमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी ग्रामस्थ पुंजाराम गायकवाड यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here