बीड : बीडच्या मांजरसुंबा – केज राष्ट्रीय महामार्गावर नेकनूर जवळ बाईकचा आणि कारचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात बाप लेकाचा जागीच मृत्यू झाला. निकृष्ट दर्जाच्या राष्ट्रीय महामार्गामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून दररोज निष्पाप लोकांचा जीव जात असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

आंबेजोगाई – केज – मांजरसुंबा – पाटोदा या सिमेंटच्या राष्ट्रीय महामार्गावर जागोजागी भेगा पडल्याने अपघाताला निमंत्रण दिले जात आहे. आज पुन्हा दुपारच्या दरम्यान नेकनूरजवळ भीषण अपघात झाला. त्यामध्ये बाप लेकाचा जागीच मृत्यू झाला आहे. नारेवाडी येथील विनायक दादाहरी चौरे आणि विनोद विनायक चौरे हे दोघे बापलेक बीडवरून आपल्या गावाकडे निघाले होते.

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या प्रकृतीबाबत आली मोठी अपडेट, आयसीयूतून बाहेर हलविले
दरम्यान, नेकनूरपासून काही अंतरावर तळ्याजवळ व्हिस्टा कारचा आणि होन्डा शाईन बाईकचा भीषण अपघात झाला. या अपघातात बाप लेकाचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नेकनूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदरील अपघात नेमका कसा झाला? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

रस्ता आहे की चटई?; लोकांनी हातानं उचलून घडीच घातली, छ. संभाजीनगरात मोठा घोटाळा, तरुणांकडून पोलखोल, पाहा व्हिडिओ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here