मुंबई: आईची हत्या करून २२ वर्षीय तरूणाने आत्महत्या केली आहे. ही धक्कादायक घटना विक्रोळीच्या कन्नमवार नगरातून समोर आली आहे. उमा तावडे (वय वर्ष – ५३) आणि अभिषेक तावडे (वय वर्ष – २२) अशी मायलेकांची नावे आहेत. अभिषेक बेरोजगार असल्याची माहिती आहे. तसेच, त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याने या आई लेकामध्ये वारंवार खटके उडायचे. त्यातूनच हे कृत्य करण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबईतील विक्रोळी परिसरातील कन्नमवार येथील गुलमोहर सोसायटीमध्ये अभिषेक हा आई-वडिलांसोबत वास्तव्यास होता. त्याचे वडील लोअर परळ येथे कामाला होते. तर आई एका दवाखान्यात काम करते. आई आणि मुलामध्ये रोज भांडणं होत असत. त्यामुळे या भांडणाला कंटाळून वडील कार्यालयातच थांबायचे. ते आठवड्यातून फक्त दर रविवारी घरी जायचे.

नको जाऊ गं… बापाने पाया पडल्या, विनवण्या केल्या, पण त्या निष्ठुर पोरीने काही ऐकलं नाही, अन्… पाहा VIDEO
नेहमीप्रमाणे वडील रविवारी घरी आले आणि त्यांनी दरवाजा ठोठावला. मात्र, दरवाजा कुणीही उघडला नाही. त्यामुळे मुलाला आणि पत्नीला आवाज दिला. तरीही आतून कुणीच प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर वडिलांनी शेजारच्यांच्या मदतीने पोलिस आणि अग्निशमन दलाला याची माहिती दिली. घटनेचं गांभीर्य पाहता पोलिस आणि अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी दरवाजा तोडला. तेव्हा घरात उमा या बेडरुमध्ये मृतावस्थेत आढळल्या तर अभिषेक बाहेरच्या खोलीत गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला. हे दृष्य पाहून वडिलांनी एकच टाहो फोडला.

फेसबुकवरील प्रेम ‘लिव्ह इन’पर्यंत आलं, संशयाचं भूत डोक्यात शिरलं, एकाच वादात सगळं संपवलं!

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत अपमृत्यूची नोंद केली आहे. यामध्ये काही संशयास्पद असे काहीच आढळले नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. दरम्यान, अभिषेक याने आईची हत्या करून आत्महत्या का केली असावी, यामागील नेमके कारण समजू शकले नसल्याचेही पोलिसांनी सांगितले. पुढील तपास पोलिस करत आहेत. पण, या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

मायलेकाचा अपघाती मृत्यू, मृतदेहाजवळ दोन मुली बसलेल्या, मन सुन्न करणारं दृष्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here