दिल्ली : उत्तर दिल्लीतील नरेला पोलिस ठाणे परिसरात एका १२ वर्षीय मुलाचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाला. हा स्विमिंग पूल एका खाजगी शाळेच्या आत होता. निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा ठपका ठेवत दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.नवी दिल्ली: उत्तर दिल्लीतील नरेला पोलीस स्टेशन हद्दीतील एका खाजगी शाळेच्या आवारात बांधलेल्या स्विमिंग पूलमध्ये एका १२ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू झाला. संध्याकाळी जलतरण तलाव बाहेरील लोकांसाठी देखील उघडला जातो. या जलतरण तलावाचे केअरटेकर प्रति व्यक्ती शुल्क आकारून स्विमिंग पूलमध्ये पोहण्याची परवानगी देतात. या जलतरण तलावात मोठा निष्काळजीपणा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या प्रकृतीबाबत आली मोठी अपडेट, आयसीयूतून बाहेर हलविले
सोमवारी संध्याकाळी १२ वर्षीय रजब हा मुलगा आपल्या मामासोबत आंघोळ करण्यासाठी स्विमिंग पूलवर पोहोचला. खरं तर, रजब हा उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या घरी आला होता आणि मामासोबत स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करण्यासाठी गेला होता. तो स्विमिंग पूलमध्ये खोल पाण्यात गेला. तेथे त्याला पाण्याचा अंदाज आली नाही आणि मुलाचा बुडून मृत्यू झाला.

महिलेने मुलांकडून करून घेतली आपल्या अर्धनग्न शरीरावर पेंटिंग, बनवला व्हिडिओ आणि…
याबाबत जलतरण तलावाचे केअरटेकर सांगतात की, इतर मुलांनी रजबला खोल पाण्यात नेले. यादरम्यानच ही दुर्दैवी घटना घडली. ज्या मुलांना पोहता येत नव्हते असा मुलांवी रजबला पोहायला नेले होते. यामुळेच तो बुडाल्याचे सांगण्यात येत आहे.

लग्नाच्या दिवशीच पळून गेली नवरी, शाळेत जाऊन लपली, सकाळी कारण सांगितल्यावर लोक थक्क झाले
दरम्यान, अशा मुलांना इतक्या खोल पाण्यात जाण्याची परवानगी का देण्यात आली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोहता येत नसलेल्या मुलांसाठी पाण्याच्या स्वतंत्र तलावाची व्यवस्था का करण्यात आली नाही. सध्या नरेला पोलीस ठाण्यात निष्काळजीपणामुळे मृत्यूची नोंद करून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here